आज आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत की ई-केवायसी पंचनामा कसा करायचा आहे. शेतकऱ्यांचे दुष्काळ व अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ई-केवायसी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्या दृष्टीने शेतकरी तसे फॉर्म देखील भरत आहेत.
फॉर्म भरून झाल्यानंतर शेतकऱ्यांना महा-ई-सेवा क्रमांक सादर करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत.
ई-केवायसी करताना कोणती काळजी घ्यावी?-
आपल्या आधार क्रमांकाशी आपला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. आपला मोबाईल क्रमांक बरोबर आहे का याची खात्री करावी व तसेच बँक पासबुक खाते नंबर बरोबर आहे का याची देखील खात्री करावी.
किती दिवसात पैसे जमा होतील?-
या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले आहे, त्यांचे पैसे 3 ते 4 दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत किंवा शासनाच्या आदेशानुसार हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात.
ई-केवायसी करण्यासाठी काय आवश्यक आहे-
ई-केवायसी करण्यासाठी फक्त एक विशिष्ट क्रमांकाची गरज आहे. तो क्रमांक आपल्याला आपल्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जी यादी आहे त्यात मिळेल.
ई-केवायसी घरबसल्या मोबाईलद्वारे करता येऊ शकते का?-
ई- केवायसी घरबसल्या मोबाईलद्वारे करता येऊ शकणार नाही. कारण की ही ई-केवायसी प्रक्रिया फक्त महा-ई-सेवा केंद्र चालकच करू शकतात.
शासनाने शेतकऱ्यांना लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या स्थितीला ई-केवायसी करण्याची वेबसाईट थोडी स्लो चालत आहे. परंतु ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण आपली ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही नम्र विनंती.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.