यावेळेस आनंदाचा शिधा उशिराने मिळणार…

यावेळेस सरकारने गुढीपाडव्यासाठी आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्याप आनंदाचा शिधा हा गोदामातच आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हा शिधा स्वस्त धान्य दुकानापर्यंत अजून पोहोचलेला नाही. त्यामुळे धान्य दुकानदार त्याचे वाटप करू शकणार नाहीत.

दिवाळी सणानंतर आता गुढीपाडवा ही गोड व्हावा यासाठी शासनाने 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आचारसंहितेमुळे हा आनंदाचा शिधा या वेळेस उशिरा मिळणार आहे. असा निर्णय शासनाद्वारे घेण्यात आलेला आहे. गुढीपाडव्याच्या अगोदर आनंदाचा शिधा मिळेल अशी रेशन कार्डधारकांना अपेक्षा होती. परंतु आता आनंदाच्या शिध्याशिवायच यावेळेस गुढीपाडवा साजरा करावा लागणार आहे.

नोट-जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *