महाराष्ट्र पोलीस भरती 2024. जाणून घेऊया अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे.

महाराष्ट्र पोलीस भरती याविषयीची माहिती सदर लेखातून जाणून घेणारा आहोत. या भरतीसाठी ज्या उमेद्वारांना अर्ज करायचा आहे, त्याच्याकरता आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचा अर्ज भरायचा राहिलेला आहे. त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. चला तर मग जाणून घेऊया ऑनलाइन अर्ज कसा करावा.

सदर भरतीची माहिती-

या भरतीसाठी अर्ज करताना खालील दिलेल्या कागदपत्रांशिवाय इतर कागदपत्रे देखील लागू शकतात. त्यामुळे फॉर्म भरताना सर्व कागदपत्रे बरोबर ठेवून काळजीपूर्वक भरावा. एकूण वेगवेगळी 22 कागदपत्रे पोलीस भरतीसाठी लागणार आहेत. ही कागदपत्रे पदानुसार लागणार आहेत म्हणजे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यानुसार तुम्हाला कागदपत्रे द्यायची आहेत. महत्वाची माहिती

सदर भरतीची आवश्यक कागदपत्रे-

  • अर्जदाराचे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स)
  • दहावीचे मार्कशीट
  • बारावीचे मार्कशीट
  • पदवीधर असल्यास गुणपत्रक
  • मुक्त विद्यापीठातून शिकत असल्यास गुणपत्रक
  • पदवीधर पदवीत्तीर्ण पदवी असल्यास गुणपत्रक
  • डिप्लोमा केला असेल तर मार्कशीट
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शाळेत शिकत असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र
  • कास्ट सर्टिफिकेट
  • वयाचा पुरावा
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र
  • महिलांसाठी 30% आरक्षणाचे प्रमाणपत्र
  • प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असल्यास प्रमाणपत्र
  • खेळाडू असल्यास प्रमाणपत्र
  • होमगार्ड प्रमाणपत्र
  • वडील पोलीस असतील तर प्रमाणपत्र
  • माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी डिस्चार्ज कार्ड ओळखपत्र
  • माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी आर्मी एज्युकेशन प्रमाणपत्र

भरतीसाठी अर्ज कसा करावा-

  • सर्वात अगोदर  www.mahapolice.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
  • नंतर होमपेज वरील भरती Recruitment या Option वर क्लिक करा व त्यातील सर्व माहिती वाचून घ्या.
  • त्यानंतर Apply Online या Link वर क्लिक करा, नंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल.
  • त्या फॉर्ममध्ये असलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
  • नंतर लागणारी आवश्यक कागदपत्रे ,फोटो आणि सही सोबत इतर कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर परीक्षेसाठी असणारी फी भरून घ्या. फी भरण्यासाठी तुम्ही फॉर्म मध्ये दिलेला कोणताही पेमेंट मोड वापरू शकता.
  • परत एकदा पोलीस भरतीचा फॉर्म तपासून घ्या व शेवटी फॉर्म खाली दिलेल्या सबमिट या बटन वर क्लिक करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 एप्रिल 2024

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *