घरी बसल्या काढा मतदान कार्ड. जाणून घेऊया अर्ज कसा करावा.

आपल्या देशात लोकसभेच्या निवडणुका 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान पार पडणार आहेत. या निवडणुकीमध्ये जर तुम्हाला मतदान करायचे असेल तर तुमचे नाव मतदान यादीत असणे आवश्यक आहे व तसेच तुमच्याकडे मतदान कार्ड असणे गरजेचे आहे. शेवटची मतदान यादी प्रकाशित झालेली आहे, तुमचं नाव आहे की नाही ते पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा. जर यादीत आपले नाव नसेल तर कसे नोंदवावे हे जाणून घेऊया.

मतदान ओळखपत्र माहिती-

  • मतदान ओळखपत्र म्हणजे वोटर आयडी कार्ड. हे दाखवून भारतातले नागरिक मतदान करतात म्हणजे हे एक फोटो ओळखपत्र आहे व त्यालाच इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड (EPIC) असे म्हणून ओळखले जाते.
  • मतदान ओळखपत्र काढण्यासाठी आपण ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.
  • मतदान कार्ड काढण्यासाठी सर्वात अगोदर फॉर्म 6 हा मतदान यादीत नाव नोंदवण्यासाठी भरावा लागतो. तसेच त्याच्या बरोबर तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो, वयाचा व पत्त्याचा दाखला द्यावा लागतो. जे लोक पहिल्यांदाच मतदान ओळखपत्र काढत आहेत, त्यांनी जन्माचा दाखला, आधार कार्ड, 10वी किंवा 12वी चा दाखला, ज्यावर जन्मतारीख लिहिलेली असते, असे कागदपत्रे जोडून द्यायची आहेत. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ‘Others’ म्हणून पर्याय दिला आहे. तुम्ही जेथे राहता तेथील काही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही तुमच्या पत्त्यावर आलेल एखादं पत्र ही पुरवा म्हणून जोडू शकता.
  • जे व्यक्ती बेघर आहेत, म्हणजेच फूडपाथवर किंवा फ्लायओव्हर खाली राहतात त्यांच्यासाठी देखील वोटर आयडी बनवू शकतात. त्यासाठी फॉर्म 6 भरून एक डिक्लेरेशन द्यावे लागते. त्यानंतर त्या विभागातले बूथ लेव्हल ऑफिसर(BLO) कमीत कमी तीनदा त्या जागेला भेट देऊन, ती व्यक्ती त्याच ठिकाणी राहते की नाही याची खात्री करून घेतात. एवढी प्रक्रिया झाली की अर्जदाराला सहज वोटर आयडी कार्ड मिळते.

मतदान ओळखपत्र काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी

  • अर्जदार व्यक्ती हा भारताचा नागरिका असावा.
  • ज्या व्यक्तीने अर्ज केला आहे त्याचे वय 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै किंवा 1 ऑक्टोबरला 18 वर्षे पूर्ण असावे. तरच असा व्यक्ती अर्ज करू शकतो.
  • ज्या ठिकाणी तुम्हाला मतदार म्हणून नोंदणी करायचे आहे, तेथील तुम्ही रहिवासी असणे आवश्यक आहे.

ऑफलाईन अर्ज कसा करावा

  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी फॉर्म 6 च्या दोन कॉपी लागतात. इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर, असिस्टंट इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर किंवा बीएलओ पातळीवरच्या अधिकाऱ्यांकडून हा फॉर्म मोफत मिळतो.
  • त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही स्वतःचा हा फॉर्म संबंधित इलेक्टोरल ऑफिस किंवा असिस्टंट इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसरकडे जमा करू शकता किंवा पोस्टाने देखील पाठवू शकता. त्याचबरोबर तुम्ही बूथ पातळीवरील अधिकाऱ्यांकडे देखील हा फॉर्म देऊ शकता.

ऑनलाइन अर्ज कसा करावा-

  • जर आपण ऑनलाईन अर्ज केला तर आपणास सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या घालाव्या लागत नाही.
  • आपल्याला घरबसल्या ऑनलाईन अर्ज देखील करता येऊ शकतो. त्यासाठी आपण या वेबसाईटवर जावे. येथे Iogin/Register या पर्यायावर क्लिक करावे.
  • जर आपण पहिल्यांदाच या वेबसाईटवर आला असाल तर यावर अकाउंट असण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे मग Don’t have account. Register as a new user या पर्यायावर क्लिक करावे.
  • एवढे झाले की तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • त्या पेजवरील डावीकडील पर्याय म्हणजेच रजिस्टर अ‍ॅज न्यू एलेक्टर/ वोटर वर क्लिक करा
  • फॉर्म 6 उघडल्यावर राज्य, जिल्हा, विधानसभा, मतदारसंघ, नाव, जन्मतारीख, सध्याचा पत्ता, कायमचा पत्ता अशी माहिती आणि पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा.
  • आपण जे प्रूफ म्हणून कागदपत्रे जोडणारा आहोत त्यावर क्लिक करावे व त्याची कॉपी अपलोड करावी.
  • नंतर स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाका. एवढे झाले की फॉर्म परत तपासून बघा. कारण जर आपण एकदा फॉर्म सबमिट केला तर त्यात आपणास काही बदल करता येणार नाही.
  • जर सर्व व्यवस्थित असेल तर शेवटी फॉर्म सबमिट करा. जेव्हा तुम्ही सर्व प्रोसेस कराल तेव्हा तुमच्या मेल बॉक्स वर एक ई-मेल किंवा रजिस्टर मोबाईल नंबर वर मेसेज येईल. त्यात अ‍ॅक्नॉलेजमेंट नंबर असेल. तो वापरून तुम्ही वेळोवेळी आपल्या अर्जाचा स्टेटस ट्रॅक करू शकता.
  • निवडणूक आयोगाने आता व्होटर हेल्पलाईन नावाचा मोबाईल ॲप देखील तयार केले आहे. ज्यात व्होटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्ही या सगळ्या प्रक्रियेद्वारे व्होटर आयडी कार्डसाठी अर्ज करू शकता.
  • जर आपण ऑनलाईन अर्ज केला तर बूथ लेव्ह्लचे अधिकारी तुमच्या पत्त्यावर जाऊन व्हेरिफिकेशन करतात.

जर आपले व्होटर आयडी हरवले असेल किंवा नाव, पत्ता बदलायचा असेल तर काय करावे-

  • त्यासाठी तुम्ही या वेबसाईटवर जावे व फॉर्म 8 डाऊनलोड करावा. त्याच बरोबर आवश्यक कागदपत्रांसह तो जमा करू शकता.
  • तुमच्या सर्व गोष्टी जर योग्य असतील तर तुम्हाला कमीत कमी 7 दिवसात मिळते. तसेच जास्तीत जास्त किती वेळ लागेल याची मर्यादा नाही.
  • तुमच्या मनातील शंकाचे निराकारण करण्यासाठी 1950 या नंबरवर कॉल करू शकता.
  • सरकारने अन्य अकरा ओळखपत्रांना देखील मान्यता दिली आहे, परंतु त्यासाठी तुमचे नाव मतदान यादीत असायला हवे. या पैकी एखादे दाखवून तुम्ही मत देखील करू शकता.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपल्या व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *