आज आपण शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याची ठरणाऱ्या योजनेची माहिती घेऊन आलेलो आहोत. शेतकऱ्यांना मोटर पंप घेण्यासाठी अनुदान या योजनेतून दिले जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया सदर लेखातून या योजनेचा अर्ज कोठे करावा व कसा करावा, आवश्यक कागदपत्रे, पात्रता कोणती, या योजनेसाठी अनुदान किती इ. पाहूया. या योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
सदर योजनेचे अनुदान-
विद्युत मोटर पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला जास्तीत जास्त 75% अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच अनुदानाची रक्कम ही 20 हजार रुपये इतकी असणार आहे.
सदर योजनेची पात्रता-
- अर्जदार शेतकऱ्यांनी या अगोदर पोखरा योजनेच्या माध्यमातून कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदार शेतकरी हा सरकारी नोकरी करत नसावा.
- योजनेच्या माध्यमातून दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसारच विद्युत पंप खरेदी करावा लागणार आहे.
- ज्या शेतकऱ्याकडे पाणीसाठा उपलब्ध आहे, त्यालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- 7/12 उतारा
- 8 अ उतारा
- बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
WhatsApp Group
Join Now