बाल संगोपन योजना.

आज आपण सदर लेखातून अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. शासनाद्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ही एकल पालक असलेल्या बालकांना वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत दरमहा रुपये 2,250 परिपोषण अनुदान देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, योजनेची पात्रता, कोणत्या मुलांना दरमहा पैसे मिळणार आहे, किती पैसे मिळणार आहेत, इत्यादी सर्व माहिती.

सदर योजनेची माहिती-

  • बालसंगोपन ही योजना सरकारी आहे. महाराष्ट्र शासनाने महिला व बाल विकास विभाग यांच्या साह्याने ही योजना सुरू केली आहे.
  • सन 2005 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती आणि राज्यातील अनाथ तसेच गरीब मुलांना व बालकांना आर्थिक मदत आणि त्यांना कौटुंबिक आधार देणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती.
  •  राज्यातील 50,000 हून अधिक बालकांना योजनेचा लाभ मिळत आहे.
  •  या योजनेसाठी 0 ते 18 वर्षाखालील मुले समाविष्ट आहेत.

सदर योजनेतंर्गत किती पैसे मिळतात-

  • या योजनेतंर्गत बालकांना दरमहा रु.2,250/- आर्थिक अनुदान देण्यात येते.
  • बाल संगोपन योजनेतंर्गत रोख स्वरूपात देण्यात येणाऱ्या लाभाचे स्वरूप बंद केले आहे. आता फक्त DBT द्वारे त्यांच्या बँक खात्यात सदर रक्क जमा करण्यात येते.

सदर योजनेसाठीची पात्र मुले-

  • या योजनेसाठी 0 ते 18 वर्षांमधील बालके पात्र असतील.
  • कोविड कालावधीमध्ये एक किंवा दोन्हीही पालक गमावलेले बालके
  • ज्या मुलांच्या पालकांचा शोध लागत नाही अशी अनाथ बालके
  • अविवाहित, कुष्ठरोग, विभक्तीकरण, घटस्फोटीत, मातृत्व गंभीर आजार पालक अशी बालके
  • बहू विकलांग बालके, दोन्ही पालक आई वडील दिव्यांग अपंग अशी बालके, मतिमंद बालके, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एच आय व्ही नी ग्रस्त असलेलली बालके,
  • फेटाळणी व दुर्लक्ष न्यायालयीन किंवा पोलीस प्रकरणात अपवाद परिस्थितीतील बालके
  • शाळेत न जाणारे बालकामगार बालके,
  • तुरुंगात असलेले पालक एच आय व्ही किंवा कॅन्सर सारख्या दूरधर आजाराने ग्रासलेले पालक, कौटुंबिक

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • अर्जाच्या फाईल सोबत इतर कागदपत्रे जोडणे ही आवश्यक आहे.
  • पालकांचे आधार कार्ड
  • बालकाचे आधार कार्ड
  • जन्म दाखला
  • रहिवाशी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • कुटुंबाचा एकत्रित फोटो
  • आई वडील मृत असल्यास मृत्यू प्रमाणपत्र
  • बालक मतिमंद दिव्यांग असल्याचे दिव्यांग प्रमाणपत्र
  • दिव्यांग बालकाचा पूर्ण फोटो
  • पालकाचे बँक किंवा पोस्टाच्या पासबुकची झेरॉक्स
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • बोनाफाईड सर्टिफिकेट
  • मृत्यूचा अहवाल
  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • घरासमोर पालकासोबत बालकांचा फोटो
  • पालकाचे पासपोर्ट साईज फोटो
  • मुलांचे पासपोर्ट साईज फोटो(2)
  • निकषानुसार इतर कागदपत्रे इत्यादी

सदर योजनेसाठीचा अर्ज कसा करावा-

अर्जदाराने या योजनेचा अर्ज करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांच्याकडे विहित नमुन्यातील फॉर्म भरून द्यायचा आहे. त्यांच्याद्वारे हा फॉर्म राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांच्यापर्यंत पाठवला जातो.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद !

अर्जाची PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *