लेक लाडकी योजना 2024… अर्ज कसा करावा?

सदर योजनेचा उद्देश

  • महाराष्ट्र सरकारद्वारे मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात येत आहे.
  • पिवळ्या व केशरी रेशनकार्ड कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्या-टप्प्यांमध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील.

सदर योजनेची लाभार्थी पात्रता-

  • पिवळ्या व केशरी रेशनकार्ड कुटुंबात जन्म झालेल्या मुलींना याचा लाभ मिळणार आहे.
  • या योजनेचा लाभ 1 एप्रिल 2023 व त्यानंतरच्या जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू असणार आहे.

सदर योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप-

मुलीचा जन्म झाल्यावररु. 5000/-
मुलगी पहिलीत गेल्यावररु. 6000/-
मुलगी सहावीत गेल्यावररु. 7000/-
मुलगी अकरावीत गेल्यावररु. 8000/-
मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावररु. 75,000/-
एकूण लाभरु, 1,0,1000/-

सदर योजनेच्या अटी व शर्ती-

  • ही योजना पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील.
  • एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहते.
  • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता / पित्याने  कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
  • तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ  अनुज्ञेय राहील. पण त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. 1 लाख पेक्षा जास्त नसावे.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • लाभार्थी आधार कार्ड (प्रथम लाभाच्या वेळी ही अट शिथिल राहील.)
  • पालकाचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड (पिवळा किंवा केशरी)
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • लाभार्थ्याचा जन्माचा दाखला
  • तहसीलदाराचे कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला
  • मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरीता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर)
  • संबंधित टप्प्यावरील लाभाकरीता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
  • अंतिम लाभाकरीता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.

सदर योजनेसाठीचा अर्ज करण्याची पद्धत-

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून PDF डाऊनलोड करायची आहे. तसेच त्यामध्ये सविस्तर माहिती भरून व आवश्यक ती कागदपत्रे जोडून खाली दिलेल्या ठिकाणी जमा करायची आहेत.
  • तो अर्ज आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जमा करावा.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *