10 वी, 12 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

आज आपण सदर लेखातून जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. नवोदय विद्यालय समिती भरतीसाठी पदवीधर, LLB, 10 वी पास, 12 वी पास, B.Sc, B.Tech आणि ITI अशा वेगवेगळ्या पात्रतेवर भरती प्रक्रिया होणार आहे. वरीलपैकी कोणतीही एक पात्रता आपण पूर्ण करत असाल, तर नोकरीची सुवर्णसंधी आपल्याला मिळणार आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत,  म्हणजेच ऑफलाईन अर्ज सादर केला, तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. ही नोकरी कायमस्वरूपाची असणार आहे. तसेच नोकरीचा कालावधी कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार नवोदय विद्यालय समितीकडे असणार आहे.

निवड झालेल्या उमेदवाराला त्या जागेवर कायमस्वरूपी नियुक्त करायचे की नाही ते पूर्णपणे उमेदवाराच्या परफॉर्मन्सवर अवलंबून असणार आहे. जर आपला परफॉर्मन्स चांगला असेल तर आपल्याला त्या पदावर अधिक कालावधीसाठी ठेवले जाणार आहे. जर परफॉर्मन्स खराब असेल तर कोणत्याही नोटीस शिवाय उमेदवाराला पदावरून काढून टाकण्याचा अधिकार नवोदय विद्यालय समिती यांच्याकडे असणार आहे.

  • भरतीचे नाव- NVS भरती 2024
  • रिक्त जागा– 1377
  • पदांची संख्या– 14
  • नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
  • वेतन श्रेणी- रु. 63,200/- प्रति महिना (वेतन पदानुसार वेगवेगळे असणार आहे)
  • परीक्षा फी- Open आणि OBC गटाला पद 1 साठी 1500 रुपये, पद 2 ते 14 साठी 1000 रुपये, मागासवर्गीय उमेदवारांना 500 रुपये
  • अर्ज सुरू होण्याची तारीख– 24 मार्च 2024
  • शेवटचा अर्ज करण्याची तारीख– 30 एप्रिल 2024
पदाचे नाव पद संख्याशिक्षणाची अटवयाची अ‍ट
स्टाफ नर्स (महिला) (Group-B)121B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing), 2 वर्ष अनुभव35 वर्षापर्यंत
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B)05पदवीधर, 3 वर्ष अनुभव23 ते 33 वर्ष
ऑडिट असिस्टंट (Group-B)`12B.Com18 ते 30 वर्ष
ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर (Group-B)04इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवीधर, हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 2 वर्ष अनुभव32 वर्षापर्यंत
लीगल असिस्टंट (Group-B)01LLB, 3 वर्ष अनुभव23 ते 35 वर्ष
स्टेनोग्राफर (Group-B)2312वी उत्तीर्ण, डिक्टेशन: 10 मिनिटे लिप्यंतरण: संगणकावर 50 मि. (इंग्रजी), 65 मि. (हिंदी)18 ते 27 वर्ष
कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C)02BCA/B.Sc. (comp. sci./ IT) किंवा BE/B.Tech (comp. sci./IT)18 ते 30 वर्ष
कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C)78हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षाच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र35 वर्षापर्यंत
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre)2112वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 किंवा हिंदी टायपिंग 25 किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण18 ते 27 वर्ष
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre)36012वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 किंवा हिंदी टायपिंग 25 किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण18 ते 27 वर्ष
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C)12810वी उत्तीर्ण, ITI(Electrician/Wireman), 2 वर्ष अनुभव18 ते 40 वर्ष
लॅब अटेंडंट (Group-C)16110वी उत्तीर्ण +लॅब टेक्रिक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण18 ते 30 वर्ष
मेस हेल्पर (Group-C)44210वी उत्तीर्ण, 02 वर्ष अनुभव18 ते 30 वर्ष
मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C)1910वी उत्तीर्ण18 ते 30 वर्ष

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

सदर भरतीची माहिती

या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट नुसार केली जाते. यामध्ये सर्वात अगोदर लेखी परीक्षा घेतली जाते. त्यात 1/4 अशी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते.

जे उमेदवार परीक्षेत पास झाले आहेत त्यांना मुलाखतीसाठी म्हणजेच Interview साठी बोलवले जाते. Interview आणि लेखी परीक्षेचे दोन्ही मार्क एकत्र करून मेरिट लिस्ट काढली जाते.

मिरिट लिस्ट मध्ये जे उमेदवार पात्र होतील त्यांची निवड रिक्त पदांसाठी केली जाते.

सदर भरतीचा अर्ज करण्याची पद्धत-

सर्वात अगोदर भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक शोधा व तो फॉर्म ओपन करण्यासाठी त्यावर क्लिक करा.

फॉर्म भरताना उमेदवाराने PDF मध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.

परीक्षा फी भरून झाल्यानंतर अर्ज सबमिट करावा करा.

नोट– जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद1

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *