रेल्वे सुरक्षा दल(RPF) भरती 2024

भारतीय सुरक्षा दलाच्या माध्यमातून मोठी भरती निघाली आहे. जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यामुळे ही संधी गमवू नका. ही भरती केवळ 10 वी पास व पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी आहे.

भरतीचे नाव- RPF Bharti 2024

एकूण जागा– 4660

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

पगार- रु.35,400/- प्रति महिना

परीक्षा फी- रु.500/- (मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु.250/-)

अर्ज करण्याची प्रक्रिया- ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख- 15 एप्रिल 2024

शेवटची अर्ज करण्याची तारीख- 14 मे 2024

पदाचे नाव पदसंख्यावयाची अटशिक्षण
सब इन्स्पेक्टर45218 ते 25 वर्षकोणतीही पदवी
कॉन्स्टेबल420821 ते 28 वर्षकिमान 10 वी पास

सदर भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत-

  • सर्वात अगोदर अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.
  • नंतर तेथे आपणास Apply Online हा पर्याय निवडायचा आहे.
  • एवढे झाले की तुमच्यासमोर RPF Bharti चा Application Form Open होईल. त्या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे. तसेच PDF मध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून अर्ज भरायचा आहे.
  • नंतर भरतीसाठी लागणारी आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. तसेच साइट वरती दिलेल्या साईज नुसार कागदपत्रांची साईज असावी.
  • कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर RPF Bharti साठी परीक्षा फी भरायची आहे.
  • RPF Bharti चा अर्ज फी भरून झाल्यावर उमेदवाराने सबमिट करायचा आहे.
  • जर फॉर्म सबमिट झाला तरच तुम्ही या भरतीसाठी पात्र असणार आहात. त्यामुळे अर्ज हा योग्य पद्धतीने सबमिट करावा.

सदर भरतीची फॉर्म भरून झाल्यानंतरची पद्धत-

  • ऑनलाईन फॉर्म सादर केल्यावर सुरुवातीला कॉम्प्युटरवर CBT Exam घेतली जाणार आहे. म्हणजेच ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेतली जाणार आहे.
  • परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. जे उमेदवार  परीक्षेत पास झालेले आहेत त्याना बोलवले जाणार आहे.
  • नंतर उमेदवारांची सर्व कागदपत्रे पडताळली जाणार आहेत व शेवटी मेडिकल तपासणी करून मेरिट लिस्ट काढली जाणार आहे.
  • ज्या उमेदवारांना सर्वात चांगले गुण मिळालेले असतील, त्या उमेदवारांना रिक्त जागांसाठी निवडले जाणार आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *