महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सर्व कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक केले गेले आहे. आपल्याला माहित आहे की या अगोदरील शासकीय कागदपत्रांवर वडिलांचे नाव बंधनकारक करण्यात आलेले होते, तसेच आता आईचे नाव देखील शासकीय कागदपत्रांवर बंधनकारक करण्यात आलेले आहे. आता वडिलांच्या नावाच्या अगोदर आईचे नाव लावणे आवश्यक असणार आहे. चला तर मग शासन निर्णय काय आहे सदर लेखातून जाणून घेऊया.
शासन निर्णय-
- शासकीय दस्तऐवजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दाखवता उमेदवाराच्या आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदनी करणे बंधनकारक केले आहे.
- 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांचा नावाची नोंद बालकाचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव व नंतर आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवापुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्याची मान्यता दिली आहे.
- लग्न झालेल्या स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे.
- स्त्रीला विवाह अगोदरच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now