आता OBC विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 60,000 रुपये. जाणून घेऊया सविस्तर माहिती.

आज आपण सदर लेखातून विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या माध्यमातून OBC विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 60,000 रुपये स्कॉलरशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर मग सदर लेखातून आपण याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

ही योजना आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं व सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या धरतीवर ज्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश न मिळालेला आहे. त्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्यात यावे यासाठी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या विद्यार्थ्यांकरता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने दि. 19-10-2023 रोजी बैठकीत मान्यता दिली आहे.

ही योजना विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, अधिछात्रावृत्ती वस्तीगृह व वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता तसेच स्वाधार,स्वयंम व भविष्यातील कोणत्याही प्रस्तावित योजनेमध्ये सातत्याचा सातत्य राखणे हा आहे.

ही योजना भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळता विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू असणार आहे. ही योजना विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा 600 याप्रमाणे एकूण 21,600 विद्यार्थ्यांकरता राबविण्यात यावी याची मान्यता देण्यात आलेली आहे.

सदर योजनेची पात्रता-

  • या योजनेसाठी पात्र असणारा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व तो वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असावा.
  • इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सक्षम प्राधिकराकडे दिलेला असावा व तो सादर करणे बंधनकारक आहे.
  • जे विद्यार्थी अनाथ प्रवर्गातून अर्ज करणार आहेत. त्यांना महिला व बालविकास विभागाकडून सक्षम प्राधिकार्‍याचे अनाथ प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
  • जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांना जिल्हा शल्यचिकित्सालय यांच्याकडून 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
  • जे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थ्यांनी स्वतःच्या राष्ट्रीयकृत बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करणे गरजेचे आहे.
  • विद्यार्थ्याने जेथे प्रवेश घेतला आहे त्या शहराचा किंवा तालुक्याचा रहिवाशी नसावा.

सदर योजनेची शैक्षणिक पात्रता-

  • 12वी नंतर उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे.
  • अर्ज करताना व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेसाठी पात्र राहण्यासाठी 60% गुण असणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी इयत्ता बारावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाते.
  • या योजनेच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 70% जागा व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 30% जागा असणार आहे.
  • निवडला जाणारा विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पर्ण होईपर्यंत लाभास पात्र असणार आहे.
  • तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस दिली जाणार आहे.
  • जर एखाद्या शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदवीधर अभ्यासक्रमासाठी तो विद्यार्थी पात्र राहणार नाही.
  • या योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती किमान 75% असावी.
  • निवड झालेल्या विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 5 वर्ष स्कॉलरशिप दिली जाणार आहे.
  • जे विद्यार्थी इंजिनिअरिंग, वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना जास्तीत जास्त 6 वर्षे ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे.
  • अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी देखील या योजनेसाठी पात्र असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडलेला आहे, ते विद्यार्थी देखील या योजनेसाठी पात्र असणार आहे. परंतु सुनिश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा जास्त वयाचा विद्यार्थी नसावा.
  • सदर योजनेसाठी पात्र असणारा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तर त्याला या योजनेचा लाभ त्या कालावधीमध्ये घेता येणार नाही. उत्तीर्ण झाल्यावर असा विद्यार्थी लाभासाठी पात्र असणार आहे. पाच वर्षाचा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण असे दोन्ही कालावधींची गणना करण्यात येईल.

सदर योजनेच्या पात्रतेच्या अटी-

  • जो विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असेल त्याला इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधी शैक्षणिक संस्थेच्या वस्तीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा.
  • जे विद्यार्थी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ घेत असतील. तर या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.
  • या योजनेसाठी पात्र असणारा विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
  • जर विद्यार्थ्याने फसवणूक करून या योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • स्थानिक रहिवाशी नसल्याचे म्हणजेच भाड्याने राहत असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र
  • नोटरी
  • स्वयंघोषणापत्र
  • करारनामा
  • महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा

सदर योजनेचा अर्ज कसा करावा-

सध्या स्थितीला या योजनेसाठी कोणताही अर्ज आलेला नाही. जेव्हा राज्य सरकार अधिकृतपणे निर्णय जाहीर करेल तेव्हाच या योजनेचे फॉर्म उपलब्ध होतील. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यावर आपणास आम्ही सदर लेखातून अपडेट देऊ. या योजनेचा अर्ज कसा करावा याबाबत आत्तापर्यंत कोणती माहिती मिळालेली नाही. जर अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन असेल तर तुम्ही इतर मागासवर्गीय बहुजन विकास महामंडळाच्या कार्यालयातून फॉर्म घेऊ शकता व तो भरून सबमिट करू शकता. परंतु सध्या स्थितीला याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *