पाच रुपये दूध अनुदान होणार आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. शासन निर्णय जाहीर. 

आज आपण शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपण दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान मिळणार याबद्दलची चर्चा ऐकत आलेलो आहोत. राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. या अनुदानासाठी शासनाने आपल्याला आपल्या गुरांची सर्व माहिती टॅगिंग करण्यासाठी सांगितलेली होती व त्यानुसार सर्व गुरांची नोंदी शेतकरी बांधवांनी पशुधन ॲप मध्ये केलेली आहे.

पुढील आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा निधी जमा केला जाणार आहे. याबाबतचा महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृती पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभाग यांच्यामार्फत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या साह्याने अनुदान जमा केले जाणार आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *