आज आपण सदर लेखातून महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून आपणास मोफत झेरॉक्स व शिलाई मशीन मिळणार आहे.या योजनेचे नाव आहे झेरॉक्स शिलाई मशीन योजना. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती.
सदर योजनेची माहिती–
- ही योजना शासनाने बेरोजगार युवकांना मदत करण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून 100% अनुदान देण्यात येणार आहे.
- या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे.
- या योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
सदर योजनेची पात्रता-
- अर्जदार हा मागासवर्गीय प्रवर्गातील असायला हवा.
- अर्जदार हा दिव्यांग असायला हवा.
- या योजनेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवार अर्ज करू शकत नाहीत.
सदर योजनेची आवश्यकता कागदपत्रे-
- जातीचा दाखला
- दिव्यांग प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- ग्रामसभेचा ठराव
- शाळा सोडल्याचा दाखला
सदर योजनेची ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत-
- अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभाग कार्यालयांमध्ये जायचे आहे.
- तिथे गेल्यावर झेरॉक्स शिलाई मशीन योजनेचा फॉर्म भरायचा आहे.
- फॉर्म भरून झाला की त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडायचे आहेत व नंतर तो फॉर्म समाज कल्याण विभागाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे द्यायचा आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now