RTE प्रवेश प्रक्रिया 2024 माहिती

सदर प्रवेश प्रक्रियेची माहिती-

आज आपण RTE प्रक्रियेची माहिती सदर लेखातून जाणून घेणार आहोत. ही प्रक्रिया महाराष्ट्र शासना मार्फत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याद्वारे राबवण्यात येते. या प्रक्रियेसाठी 25% आरक्षण असते. म्हणजे गरीब व मागास विद्यार्थ्यांना नामाजलेल्या आणि मोठ्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळवण्याची सुवर्णसंधी.

RTE 2009 कायद्यांतर्गत खाजगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्यांक नसलेल्या शाळांमध्ये प्रवेशाच्या सुरुवातीस म्हणजेच नर्सरी, ज्युनिअर केजी किंवा पहिली मध्ये 25% जागा गरीब व मागास विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे व त्यांना मोफत प्रवेश देणे तसेच सरकारने इयत्ता आठवी पर्यंत मोफत शिक्षण देणे बंधनकारक केले आहे.

आपल्या घराच्या आजूबाजूला अशा कोणत्या शाळा आहेत ज्यांना ही योजना लागू आहे हे आपण वेबसाईटच्या साह्याने जाणून घेऊ शकता. दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. यामध्ये पालकांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो व ऑनलाईन लॉटरी पद्धतीने शाळा वितरित केल्या जातात. पालकांना एसएमएस किंवा वेबसाईटच्या साह्याने कळविण्यात येते.

 सदर प्रक्रियेची आवश्यक कागदपत्रे-

  • उत्पन्नाचा दाखला (एक लाखापेक्षा कमी)
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय असल्यास)
  • रहिवासी दाखला/रेशन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन/लाईट बिल/टेलीफोन बिल/घ्र्र पट्टी/बँक पासबुक/गॅस बुक/ आधार कार्ड/पासपोर्ट/इलेक्शन कार्ड
  • जन्माचा दाखला
  • दिव्यांग दाखला (अपंग असल्यास)

हे लक्षात असू द्या-

सदर प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. फॉर्म भरण्यासाठी किंवा प्रवेशासाठी कोणतीही फी किंवा पैसे देण्याचे गरज नाही. शासनाने प्रत्येक जिल्ह्यात मोफत माहिती देणारी मदत केंद्र उभारली आहेत. आपण तिथे जाऊन मोफत फॉर्म भरू शकतात किंवा सायबर मध्ये जाऊन फॉर्म भरू शकता.

ऑनलाईन लॉटरी पद्धतीने या मुलांची निवड होईल. त्यांच्या पालकांनी मुलांना घेऊन प्रवेश घेण्यासाठी परस्पर शाळेत न जाता एज्युकेशन ऑफिसरद्वारा निर्माण केलेल्या ब्लॉक व्हेरिफिकेशन सेंटर आणि ऍडमिशन सेंटरवर जायचे आहे. तेथे प्रवेश पत्र म्हणजे अलॉटमेंट कार्डची झेरॉक्स, ओरिजनल कागदपत्रे आणि झेरॉक्स प्रति तपासल्या जातील.

तेथे ब्लॉक कमिटी असेल ज्यामध्ये ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर किंवा विस्तार अधिकारी सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आणि एक पालक प्रतिनिधी यांचा समावेश असेल. ही समिती कागदपत्रे तपासून प्रमाणित करतील.

जर सादर केलेली कागदपत्रे योग्य असतील तर सिस्टम मध्ये त्यांच्या प्रवेश निश्चित केला जाईल.  कागदपत्रावर स्वाक्षरीकरून प्रमाणित केले जाईल. त्यानंतर त्यांना प्रवेश घेण्यासाठी शाळेत पाठवले जाते.

ज्यांची कागदपत्रे किंवा पुरावे ग्राह्य नसतील त्यांना प्रवेशासाठी अपात्र ठरवले जाईल व जे प्रवेशासाठी येणार नाही त्याची सिस्टम मध्ये नॉट अप्रोच अशी नोंद करण्यात येईल.

ही लॉटरी फक्त एकदाच होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी सोबतच वेटिंग लिस्ट निवड करण्यात येईल. पहिल्या राउंड मध्ये प्रवेश रिक्त राहिल्यास वेटिंग लिस्ट क्रमांक एक, वेटिंग लिस्ट क्रमांक दोन, वेटिंग लिस्ट क्रमांक तीन याप्रमाणे प्रवेश पूर्ण करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या पालकांनी जर एसएमएस आला नाही तरी ते वेबसाईटवर जाऊन आपलिकेशन स्टेटसद्वारा आपल्या अर्जाची स्थिती चेक करू शकतात.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

वयोमर्यादा GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *