आज आपण सदर लेखातून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये अनेक तालुके आणि जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून निधी वाटप करण्यात येणार आहे. हा निधी मिळवण्यासाठी ऑफलाईन स्वरूपामध्ये अर्ज सादर करावा लागणार आहे.
अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. ही योजना पुणे जिल्ह्यामधील अनेक तालुक्यांमध्ये तसेच महाराष्ट्रातील बऱ्याचशा तालुक्यांमध्ये देखील सध्या स्थितीला लागू केली जाणार आहे. आपल्या तालुक्यात ही योजना लागू आहे की नाही जर हे आपणास जाणून घ्यायचे असेल तर आपल्याजवळील तालुका कृषी अधिकारी किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधावा.
सदर योजनेमध्ये किती नुकसान भरपाई मिळणार?
साधारणतः हेक्टरी दहा हजार पाचशे रुपये मिळणार आहे. अशी माहिती आपणास मिळालेली आहे.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- विहित नमुन्यातील अर्ज
- 7/12 उतारा
- 8 अ उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक
सदर योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया-
वरती दिल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे एकत्र गोळा करून ऑफलाईन स्वरूपामध्ये अर्ज करायचा आहे व तो अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सुपूर्त करायचा आहे. नंतर त्यांच्याकडून ही सर्व कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयांमध्ये सादर केली जातात.
नोट-
- खालील लिंक वरती जाऊन या योजनेचा अर्ज डाऊनलोड करा.
- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.