मोबाईल रिचार्ज ऑफरने अनेकांचे बँक खाते रिकामे झाले आहेत.

वारंवार सर्वच बँका व्यवहार करताना सतर्कता बाळगावी, फसव्या मेसेज वर किंवा लिंक वर विश्वास ठेवू नये, आलेल्या मेसेजची खात्री करावी, कोणतेही पेमेंट करताना सावधान राहावे तसेच पेमेंट विनंतीची सत्यता पडताळून पाहावी असे सांगत असते. जर अनोळखी नंबर वरून व्हाट्सअप, यूपीआयडी, क्यूआर कोड, ई-मेल किंवा फसवे कॉल इत्यादी द्वारे प्राप्त झालेल्या विनंती साठी कोणतेही पेमेंट करू नका. या माध्यमातून जागृती करण्यात येत असते.

    सायबर खात्याकडून वारंवार सूचना देण्यात देखील येत असतात. परंतु याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे अनेक जीओ सिमधारक व भारतीय सोशल मीडियावर वायरल करून त्यामध्ये निळ्या रंगाची फेक लिंक देण्यात येत आहे. तुम्ही त्या लिंक वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाका असे ऑप्शन येत आहे व नंतर ओटीपी येतो. तो ओटीपी टाकल्याने बँक खात्यामधले पैसे गायब होतात. असा प्रकार घडलेला आहे.

    फसवी लिंक तयार करून बँक खाते रिकामे करण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल केली जाते. कोणतीही शहनशा न करता ती लिंक एका ग्रुप वरून दुसऱ्या लिंक वर किंवा मेसेज द्वारे फॉरवर्ड केली जाते. रिचार्जसाठी ती लिंक ओपन केली जाते. परंतु अनेक जणांचे रिचार्ज तर आले नाही पण बँक खाते रिकामी झाले आहेत.

    जिओची लिंक जास्त काळ चालली नाही म्हणून आता सायबर गुन्हेगारांनी बँकेच्या नावाखाली गुन्हे करण्यास चालू केले आहे. त्यामुळे कृपया अशा कोणत्याही लिंकद्वारे किंवा एसएमएस द्वारे शहानिशा न करता कोणतीही प्रक्रिया करू नये ही विनंती.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *