सदर योजनेची माहिती-
आज आपण सदर लेखातून शासनाच्या नवीन योजने बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून रेशन दुकानातून महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येणार आहे. सणासुदीला या योजनेद्वारे महिलांना नवीन साडी वाटप करण्यात येणार आहे व तीही मोफत म्हणजे त्यांच्याकडून कोणतेही पैसे घेतले जाणार नाही.
ही योजना शासनाच्या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबातील महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून सणासुदीला गरीब कुटुंबातील महिलांना नवीन साडी दिली जाते. त्यामुळे साडीसाठी होणारा खर्च त्यांनला करावा लागत नाही. या योजनेच्या माध्यमातून फक्त वर्षातून एकदाच साडी दिली जाते.
2024 ते 2028 असे एकूण 5 वर्षे ही मोफत साडी योजना सुरू राहणार आहे. म्हणजेच 5 वर्षात प्रत्येकी 5 साड्या मोफत देण्यात येणार आहेत.
सदर योजनेच्या अटी-
- लाभार्थी महिलाही महाराष्ट्र राज्याची मूळची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- ही योजना फक्त गरीब, मध्यमवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी लागू आहे.
- ज्या कुटुंबाकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे, अशा महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे.
सदर योजनेची अर्ज करण्याची पद्धत-
या योजनेसाठी आपणास कोणताही फॉर्म किंवा कोणत्याही स्वरूपाचा अर्ज करण्याची गरज नाही.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.