कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज भरताय. सावध रहा.

आज आपण शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही विनंती. शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेसाठी अनुदान दिले जात आहे व त्याचे अर्ज देखील सुरू झालेले आहेत. परंतु शेतकऱ्यांना नम्र निवेदन आहे की शेतकऱ्यांनी कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज करण्यासाठी महाऊर्जेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच अर्ज करावा. शेतकऱ्यांनी कोणत्याही खोट्या एसएमएसच्या लिंकद्वारे अर्ज करू नये किंवा त्यामध्ये आपली कोणतीही माहिती आणि पैसे भरू नये. जर कोणत्या शेतकऱ्याला असा खोटा एसएमएस किंवा कॉल आला तर त्याने पोलिसांकडे जाऊन त्याबद्दलची तक्रार करावी.

काही ठकबाजांद्वारे लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर वरती एक खोटा एसएमएस येतो. त्याद्वारे शेतकऱ्यांना एक लिंक पाठवून अर्ज भरण्यासाठी तसेच पैसे भरण्यासाठी आव्हान केले जाते. त्यातून फसवणूक होत आहे. त्या लिंकद्वारे फॉर्म भरण्यात आला तर शेतकऱ्यांच्या अकाउंट वरून रक्कम वजा होते व शेतकऱ्यांनची फसवणूक होते. त्याची माहिती महाऊर्जा विभागात मिळाली आहे. त्यामुळे अशा फसव्या खोट्या एसएमएस पासून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या फसवणुकी पासून सावध राहावे असे आव्हान करण्यात आलेले आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *