पी एम किसान योजना. लगेच करा आपली नवीन नोंदणी प्रक्रिया.

आज आपण सदर लेखातून शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. जर आपले नाव पी एम किसान योजनेमध्ये नसेल तर आपण आता नवीन नोंदणी करू शकता. आपणास आता नवीन नोंदणी प्रक्रिया करता येऊ शकते.

सदर योजनेच्या काही अटी

  • अर्जदाराने केंद्र शासनाच्या पोर्टलवर स्वतः नोंदणी करणे आवश्यक आहे किंवा अर्जदार हा तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत देखील किंवा सामूहिक सुविधा केंद्र (CSC) पोर्टलवरून देखील नोंदणी करता येऊ शकते.
  • अर्जदाराने ई-केवायसी करणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराने आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे देखील गरजेचे आहे.

सदरी योजनेची नोंदणी करण्याची नवीन पद्धत-

  • अर्जदाराने केंद्र शासनाच्या पोर्टलवर स्वतः नोंदणी करणे आवश्यक आहे किंवा अर्जदार हा तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत देखील किंवा सामूहिक सुविधा केंद्र (CSC) पोर्टलवरून देखील नोंदणी करता येऊ शकते.
  • जेव्हा आपण पी एम पोर्टलवर नोंदणी करतो तेव्हा तालुका स्तरावर थेट नोंदणी केलेल्या अर्जदाराची माहिती पडताळणी करण्यासाठी तहसीलदार किंवा तालुका कृषी अधिकारी यांना तालुका कृषी अधिकारी पोर्टलवर पहाणी करण्यासाठी सादर केली जाईल.
  • यानंतर ती माहिती जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा कृषी विभाग यांच्याकडे पाठवली जाईल.
  • नंतर जिल्हा कृषी अधिकारी क्षेत्रीय कार्यालयामार्फत ती माहिती बरोबर असल्याची पाहणी केली जाईल.
  • नंतर ती माहिती आयुक्त कृषी यांच्या स्तरावर ती राज्यस्तरीय लॉगिन मध्ये सादर केली जाईल. मग तिला त्या ठिकाणी राज्यस्तरीय मान्यता दिली जाईल व नंतर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल.
  • याचा अर्थ असा की आपण जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा सर्वात अगोदर आपल्याला फॉर्म भरण्याची पावती दिली जाईल व नंतर ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
  • जेव्हा आपल्याला मान्यता दिली जाईल तेव्हा पी एम किसान सन्माननिधी योजनेचे पैसे आपल्याला मिळणे सुरू होणार आहेत. तेव्हा त्याच्याबरोबर आपल्याला सी एम किसान योजनेचे देखील पैसे मिळणार आहेत.
  • या संपूर्ण प्रक्रियेला दोन किंवा तीन महिने देखील लागू शकतात.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • 7/12 उतारा
  • 8 अ उतारा
  • फेरफार
  • मोबाईल नंबर इ.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यावाद!

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे येथे क्लिक करावे.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *