आज आपण सदर लेखातून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना केंद्र सरकार द्वारे देशातील गरीब, मध्यमवर्गीय व मागासवर्गीय लोकांना कमी पैशात विमा संरक्षण प्रदान करते.
या योजनेत फक्त 20 रुपये प्रीमियम भरावे लागते. या योजनेच्या माध्यमातून फक्त 20 रुपयात 2 लाखाचा इन्शुरन्स दिला जातो. 20 रुपये हे वर्षात फक्त एकदाच भरायचे असतात.
या योजनेसाठी तुम्हाला स्वतःहून काहीच करण्याची गरज भासत नाही. कारण तुमच्या बँक खात्यावरून प्रीमियमच्या वेळी फक्त 20 रुपये कपात केले जातात आणि तुम्हाला त्याच्या बदली पुढील वर्षभर विमा संरक्षण दिले जाते.
जर अर्जदाराचा दुर्दैवाने एक्सीडेंट किंवा मृत्यू झाला तर ही आर्थिक मदत हॉस्पिटल खर्चासाठी किंवा अर्जदाराच्या कुटुंबाला भरपाई म्हणून दिले जातात.
सदर योजनेचे वैशिष्ट्ये-
- या योजनेच्या माध्यमातून कमी पैशात जीवन विमा संरक्षण मिळते. म्हणजेच ज्या अर्जदारांनी या अगोदर कोणत्याही इतर कंपन्यांमध्ये विमा पॉलिसी काढली नसेल, त्यांना सरकारद्वारे फक्त 20 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते
- अर्जदाराचा जर दुर्दैवाने अपघात किंवा मृत्यू झाला तर 2 लाख रुपयांचे आर्थिक मदत म्हणून अर्जदाराला किंवा अर्जदाराच्या कुटुंबाला भरपाई दिली जाते.
- जर अर्जदाराला अपघातात कायमस्वरूपाचे अपंगत्व किंवा काही काळाचे अपंगत्व आले तर या योजनेद्वारे त्याला 1` लाख रुपये दिले जातात.
सदर योजनेची पात्रता-
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्ष असावे.70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या अर्जदाराला पूर्ण रक्कम एकत्रित करून दिली जाते.
- अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असावे.
- जर बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल तर अर्जदाराला जास्तीची अर्ज प्रक्रिया करावी लागते. तसेच अर्जासोबत आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत देखील जोडावी लागते.
- या योजनेच्या माध्यमातून प्रीमियम म्हणून प्रत्येक वर्षी 20 रुपये भरावे लागणार आहेत.
- तुमचे ज्या बँकमध्ये अकाउंट आहे त्या बँक खात्यातून स्वयंचलित रित्या तुमचे पैसे भरले जाणार आहेत.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- जन्माचा दाखला
- बँक पासबुक झेरॉक्स
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- योजनेचा अर्ज नमुना
- मोबाईल नंबर
सदर योजनेचा अर्ज कसा करावा-
- या योजनेसाठी आपण ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपात अर्ज करू शकतो.
- जर आपणास ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर ज्या बँकेत आपले खाते आहे त्या बँकेत जाऊन आपण अर्ज करू शकतो.
- जर अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या jansuraksha.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण अर्ज करू शकता.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.