गाय गोठा अनुदान योजना माहिती 2024

आज आपण सदर लेखातून गाय गोठा अनुदान योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचा अर्ज हा नवीन स्वरूपात भरावा लागणार आहे. तो कसा हे आपण आज जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून 100% अनुदान देण्यात येणार आहे.

सदर योजनेच्या अनुदानाचे स्वरूप

  • 2 ते 6 गुरांसाठी एक गोठा बांधला जातो. त्यासाठी 77,188/- रुपये अनुदान दिले जाते.
  • 12 गुरांसाठी या योजनेच्या माध्यमातून दुप्पट अनुदान दिले जाते.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड   
  • पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • मतदान कार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • रहिवासी दाखला
  • 7/12 उतारा
  • 8 अ उतारा

सदर योजनेच्या अर्जाचे स्वरूप-

  • सर्वात अगोदर खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करावा.
  • त्या अर्जातील सर्व माहिती भरून त्याच्याबरोबर आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत.
  • तो अर्ज घेऊन आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावा.
  • त्यानंतर महिन्याभरातच आपल्याला गोठ्याला मंजुरी मिळते.
  • ती मिळाली की ग्रामसेवक किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याकडून आपल्याला गोठा बांधण्यासाठी सांगितले जाते व नंतर आपण अधिकाऱ्याने दिलेल्या आराखड्याप्रमाणे गोठा बांधायचा आहे.
  • एवढे झाले की आपले पैसे हे जॉब कार्ड खातेदारकाच्या खात्यावर जमा होतात.
  • या बद्दलची आपणास अधिक माहिती आपल्या ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक अधिकारी यांच्याकडे मिळते.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

येथून फॉर्म डाऊनलोड करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *