आज आपण सदर लेखातून शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता कसा मिळवावा याची माहिती पाहणार आहोत. जर शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्ता नाही किंवा रस्त्यावरून जाऊन देण्यास मनाई करत आहेत. त्यासाठी आज आपण या लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. या लेखातून आपणास कायद्यानुसार शेत रस्ता कसा मिळवता येईल व त्यासाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 कलम 143 नुसार आपल्या शेतात जाण्यासाठी शेत रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी करता येते. म्हणजेच आपल्या शेतात जाण्यासाठी दुसऱ्याच्या शेतातून आपल्याला रस्ता घेता येऊ शकतो. त्यासाठी आपणास तहसीलदाराकडे अर्ज करावा लागतो. कायद्याच्या माध्यमातून शेतजमिनीसाठी रस्ता मिळवण्यासाठी सर्वात प्रथम मोजणी अर्ज तहसीलदाराकडे दाखल करावा लागतो
अर्जदाराने सादर केलेल्या कच्च्या नकाशावरून अर्जदार या अगोदर कोणत्या मार्गाचा वापर करत होता याची पाहणी केली जाते. नवीन रस्त्याची खरोखरच गरज आहे ते देखील पाहिले जाते. अर्जदाराला नवीन रस्ता दिल्यानंतर शेतकऱ्याचे होणारे नुकसान किती प्रमाणात असेल याची देखील पाहाणी केली जाते.
जर नवीन रस्ता देण्याची गरज असेल तर तो लगतच्या शेताच्या हद्दी बांधावरून देण्यात येतो. म्हणजेच बांधा लगतच्या जमिनीवरून रस्ता देण्यात येतो. या सर्व गोष्टींची खात्री करूनच तहसीलदार अर्ज मान्य करतात. तसेच जर वरील अटी शर्ती मान्य नसतील तर अर्ज रद्द देखील केला जाऊ शकतो.
सदर रस्त्यासाठी अर्ज मागणी कोठे करावी-
महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 कलम 143 नुसार तहसीलदाराकडे रस्ता मागणीसाठी अर्ज करावा लागतो.
अर्ज करण्यासाठी लाग्णारी आवश्यक कागदपत्रे-
- कच्चा नकाशा
- शासकीय मोजणी नकाशा
- अर्जदाराच्या जमिनीचा 7/12 उतारा (3 महिन्यांच्या आतील सुरु वर्षातील)
- बांधकरी शेतकऱ्याचे नाव व पत्ता
- जमिनी बाबत काही वाद सुरू असतील तर त्याची कागदपत्रे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.