सदर योजनेची माहिती–
- आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी माहिती घेऊन आलेलो आहोत. पाईपलाईन अनुदान योजनेबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
- या योजनेसाठी शेतकऱ्यांना सरकार सबसिडी देत आहे. पाईपलाईन अनुदान योजनेची सबसिडी मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- या योजनेच्या माध्यमातून आपल्याला एच.डी.पी.इ.(HDPE) व पी.व्ही.सी.(PVC) पाईपलाईनसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते.
- अनुदान मिळवण्यासाठी सरकारच्या महाडीबीटी(MahaDBT) या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- या योजनेसाठी अर्ज भरताना आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सिंचनाचा स्रोत कोणता आहे याविषयी माहिती नमूद करायची आहे. म्हणजेच उदा. विहीर, बोरवेल, शेततळे किंवा इतर कोणते आपण सिंचन वापरत आहोत त्या विषयाची माहिती आपणास द्यायचे आहे.
- अर्ज भरून झाल्यानंतर काही काळाने अर्जदाराची निवड केली जाईल. नंतर महाडीबीटी या पोर्टलवर एक लॉटरी जाहीर केली जाईल. जर या जाहीर केलेल्या यादीत आपले नाव असले तरच आपल्याला या योजनेचा फायदा घेता येणार आहे.
सदर योजनेचे अनुदान किती-
या योजनेच्या माध्यमातून आपल्याला 50% अनुदान किंवा 15 हजार रुपये पर्यंत रक्कम अनुदान म्हणून दिली जाते.
सदर योजनेची कागदपत्रे-
- बँक पासबुक
- आधार कार्ड
- 7/12 उतारा
- 8 अ चा उतारा
- ज्या ठिकाणाहून पाईप खरेदी करणार आहे त्या दुकानाचे कोटेशन
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करावे.
WhatsApp Group
Join Now
16 पाईपलाईन करायची आहे