आज आपण सदर लेखातून पीएम विश्वकर्मा योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचा अर्ज कसा करावा, याची कागदपत्रे कोणती, कोणते व्यवसायिकदार पात्र असतील इत्यादी माहिती आपण जाणून घेणार आहोत.
सदर योजनेची माहिती-
- या योजनेच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होते. तसेच या योजनेमध्ये 18 प्रकारच्या पारंपारिक व्यावसायिकांना प्रशिक्षण, भांडवल व कर्ज सुविधा पुरवली जाते.
- या योजनेत आपण जर सहभाग घेतला तर आपणास प्रमाणपत्र देखील मिळते. तसेच या योजनेतून प्रशिक्षण घेतले तर आपणात प्रत्येक दिवशी रु. 500/- देखील दिले जाणार आहेत.
- आपल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून रु.15,000/- दिले जातात.
- या योजनेच्या माध्यमातून आपणास सुरुवातीला 1 लाख रुपये पर्यंत कर्ज हे 5% व्याजदराने दिले जाते. जर हे कर्ज व्यावसायिक दाराने 18 महिन्याच्या आत परत केले तर त्याला पुढे जाऊन 3 लाख रुपयापर्यंत कर्ज देखील दिले जाते.
सदर योजनेची कागदपत्रे-
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
सदर योजनेच्या पारंपरिक व्यवसायाची यादी-
- लोहार
- सुतार
- कपडे शिवणारे
- टेलर
- गवंडी
- नाव्ही
- धोबी
- सोनार
- शिंपी
- शिल्पकार
- कलाकुसरीच्या वस्तू बनवणारे
- टोपली व झाडू बनवणारे
- बांबू पासून वस्तू बनवणारे इत्यादी
सदर योजनेचा ऑफलाईन फॉर्म भरण्याची पद्धत-
आपल्या जवळच्या महा-ई-से सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन फॉर्म भरावा.
सदर योजनेची ऑनलाईन फॉर्म भरण्याची पद्धत–
या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी pmvishwakarma.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर क्लिक करावे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now