लहान मुलांसाठी LIC ने सुरू केली “अमृत बाल योजना”. पाहूया सविस्तर माहिती.

आज आपण सदर लेखातून LIC च्या अमृत बाल योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना लहान मुलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. ही पॉलिसी 17 फेब्रुवारी 2024 पासून आपल्या मुलांसाठी खरेदी करता येऊ शकते. आपल्या कमाईतील काही रक्कम प्रत्येक पालकाला वाचवायचे असते व त्याची अशा ठिकाणी गुंतवणूक करायचे असते की भविष्यात त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा इतर गरजांसाठी वापरता येऊ शकते. जर तुम्ही असाच काही विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

सदर पॉलिसीची वयोमर्यादा व माहिती-

  • LIC ची ही पॉलिसी 30 दिवस ते 13 वर्ष वयोगटातील मुलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.
  • या पॉलिसीची परिपक्वता किमान 18 वर्ष आणि कमाल 25 वर्ष ठेवण्यात आलेली आहे.
  • 5, 6 किंवा 7 वर्षाच्या प्रीमियम पेमेंट अटी देखील या पॉलिसीसाठी उपलब्ध आहेत.
  • सदर पॉलिसीचे प्रीमियम पेमेंट ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येते व आपणास ही पॉलिसी घेता येऊ शकते.
  • या पॉलिसीसाठी किमान विम्याची रक्कम रुपये 2 लाख एवढी आहे तर किमान कोणतीही मर्यादा सेट केलेली नाही. म्हणजेच तुम्ही तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक यामध्ये करू शकता.
  • जर तुम्ही ऑनलाईन पॉलिसी घेतली तर तुम्हाला काही सूट देखील दिली जाते.
  • आपण या पॉलिसीच्या माध्यमातून प्रीमियमची रक्कम ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक अशी भरू शकतो.  
  • या पॉलिसीच्या माध्यमातून प्रीमियम पेमेंट मध्ये किमान टर्म 10 वर्ष तर सिंगल प्रीमियम पेमेंट मध्ये किमान टर्म 5 वर्ष असणार आहे. तसेच कमाल पॉलिसी टर्म प्रीमियम पेमेंट मध्ये 25 वर्ष तर सिंगल प्रीमियम पेमेंट मध्ये 25 वर्ष असणार आहे.

सदर पॉलिसीचा हमी परतावा

  • जर तुम्ही या प्लॅनमध्ये पैसे भरले असतील तर तुम्हाला प्रत्येक हजार रुपयांच्या विमा रकमेवर 80 रुपयांचा हमी परतावा मिळणार आहे.
  • विम्याच्या रकमेत हा 80 रुपयांचा परतावा जोडला जातो. उदाहरणार्थ जर तुम्ही तुमच्या मुलांच्या नावावर पॉलिसी काढली असेल ती पॉलिसी 1 लाख रुपयांचे असेल तर विम्याच्या रकमेत 8 हजार रुपये मिळतील.
  • प्रत्येक वर्षी पॉलिसीच्या शेवटी वर्षाच्या शेवटी हा हमी परतावा जोडला जाईल. परंतु त्यासाठी काही धोरण कार्यान्वित होणे गरजेचे आहे.
  • जर पॉलिसीधारक मुलाचे वय पॉलिसी भरण्याच्या वेळी 8 वर्षापेक्षा कमी असेल तर ती पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून 2 वर्षांनी किंवा पॉलिसीच्या वर्धापन दिनानंतर किंवा लगेच सुरू होईल.
  • या प्लॅनमध्ये काही अटीनसह कर्जाची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. या पॉलिसीसाठी जर तुम्ही थोडा जास्तीचा प्रीमियम भरला तर तुम्हाला तुमच्या खर्चाच्या तुलनेने प्रीमियम रिटर्न रायडर देखील उपलब्ध होतो.
  • जर तुम्हाला हा प्लॅन खरेदी करायचा असेल तर LIC एजंट किंवा LIC वेबसाईटवरून करता येतो.

सदर पॉलिसीच्या किमान हप्त्याची रक्कम-

       हप्त्याची पद्धत     किमान हप्त्याची रक्कम
मासिक रु. 5,000/-
त्रैमासिक रु. 15,000/-
सहामाही रु. 25,000/-
वार्षिक रु. 50,000/-

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *