सदर योजनेची माहिती-
- आज आपण सदर लेखातून इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे राबवण्यात येते.
- या योजनेच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील विधवा महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते. म्हणजेच राज्यातील निराधार महिलांना आर्थिक मदत दिली जाते.
- त्यामुळे त्यांना आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही. तसेच त्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनण्यास देखील मदत होते व त्यांचा आर्थिक विकास देखील होतो.
- या योजनेच्या माध्यमातून अर्ज मंजूर झाल्यानंतर दरमहा रु.1,500/- एवढा लाभ दिला जातो.
- अर्ज मंजूर झाल्यावर 3 महिन्यानंतर ही रक्कम त्यांना मिळते.
- या योजनेसाठी 40 ते 70 वर्ष विधवा महिला अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
- तसेच ती महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असणे आवश्यक आहे.
सदर योजनेची आवश्यकता कागदपत्रे-
- विहित नमुन्यातील अर्ज
- पतीचा मृत्यू दाखला व मोठ्या मुलाचा वयाचा दाखला
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मतदान कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- वयाचा दाखला
सदर योजनेचा अर्ज करण्याची पद्धत-
सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयातील सेतू केंद्राला भेट द्यावी.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now