पिठाची चक्की व शिलाई मशीन योजना 2024.लगेच करा अर्ज.

सदर योजनेची माहिती

  ही योजना महिला बालकल्याण विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील महिलांसाठी,मुलीं व अपंग महिला घेऊ शकणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची चक्की तसेच ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिको फॉल मशीन प्रदान केली जाते. ही योजना सध्या स्थितीत चालू असून 22-2-2019 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या योजनेच्या माध्यमातून 90% अनुदान देण्यात येणार आहे.

सदर योजनेच्या अटी व शर्ती-

  • पिठाची चक्की ही योजना सर्व महिलांसाठी नाही. ती फक्त अपंग महिला व मुलींसाठी आहे.
  • ही योजना फक्त बुलढाणा  जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे.
  • अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबांचे उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपयांच्या आत असावे.
  • शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील अर्जदार असल्यास त्याला प्राधान्य दिले जाईल तसेच अर्जदार हा अपंग असल्यास त्यालाही प्राधान्य दिले जाईल.
  • अर्जदाराचे वय 17 ते 45 वर्ष असावे.

सदर योजनेची कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • 8 अ उतारा
  • शिलाई मशीन प्रशिक्षण असल्यास त्याचा दाखला
  • शौचालय दाखला
  • अपंग असल्यास अपंग दाखला
  • यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचा दाखला
  • लाईट बिल

सदर योजनेसाठीचा अर्ज करण्याची पद्धत-

  • सर्वात अगोदर अर्ज करताना अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज व त्याबरोबर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे एकत्र गोळा करून त्यावरती ग्रामपंचायत मासिक सभेचा ठराव घेऊन आपल्या पंचायत समिती कार्यालयात ती कागदपत्रे सादर करावीत.
  • त्यानंतर सर्व कागदपत्रांची शाहनशा केली जाईल व त्यानंतर लाभार्थ्याची निवड केली जाईल.
  • या योजनेबाबतची अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या गावातील ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा व तसेच आपण या योजनेसाठी तेथून अर्ज करू शकता.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *