प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना माहिती 2024

सदर योजनेची माहिती-

  • या योजनेच्या माध्यमातून कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते.
  • ही योजना व्यवसायिकांना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देते.
  • या योजनेचा लाभ 2019-20 या आर्थिक वर्षात 6 कोटी 22 लाख होऊन अधिक व्यवसायिकांना मिळाला आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून कमी व्याजदराने उद्योजकांना कर्ज देण्यात येते.

सदर योजनेचे तीन प्रकार-

  1. शिशु मुद्रा लोन योजना- या योजनेच्या माध्यमातून व्यवसायिकाला 50 हजार रुपया पर्यंतचे कर्ज दिले जाते.
  2. किशोर मुद्रा लोन योजना- या योजनेच्या माध्यमातून 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत व्यवसायिकांना कर्ज दिले जाते.
  3. तरुण मुद्रा लोन योजना- या योजनेच्या माध्यमातून 5 लाख ते 10 लाख रुपये कर्ज दिले जाते.

सदर योजनेचा व्याजदर व अटी-

  • प्रत्येक बँकेनुसार कर्जावरील व्याजदर व अटी बदलू शकतात.
  • SBI बँकेचा व्याजदर हा किमान 9.75% इतका आहे. तर पंजाब नॅशनल बँकेचा व्याजदर हा 9.60% पेक्षा जास्त आहे.
  • ईएमआयच्या स्वरूपात मुद्रा लोन कर्ज 3 ते 5 वर्षात परत करावे लागते. हा कालावधी व्यवसायिकाच्या मागील क्रेडिट स्कोरवर ठरवला जातो.

सदर योजनेची बँक यादी-

इंडियन बँकसेंट्रल बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडियाएचडीएफसी बँक
कर्नाटक बँकसारस्वत बँक
बँक ऑफ बडोदापंजाब नॅशनल बँक
बँक ऑफ इंडियाआयसीआयसीआय बँक
बँक ऑफ महाराष्ट्रसिंडिकेट बँक
कॅनरा बँकयुनियन बँक ऑफ इंडिया
कोटक महिंद्रा बँकटाटा कॅपिटल
होय बँकIDBI बँक

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे

  • व्यवसायासाठी भरलेला पूर्ण अर्ज
  •  पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • रहिवासी पुरावा
  • बँक पासबुक
  • उत्पन्नाचा दाखला
  •  इतर केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे इत्यादी.

सदर योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत-

  • ज्या बँकेत अगोदरच खाते आहे तिथेच तुम्हाला कर्जासाठी अर्ज करावा लागेल.
  • यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिबिल स्कोर आहे.
  • नंतर मुद्रा लोन वेबसाईटवर जाऊन अर्ज डाऊनलोड करता येतो
  • अर्ज व योजनेची सविस्तर माहितीसाठी आपल्या जवळच्या बँकेत जाऊन घ्या किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *