आज आपण सदर लेखातून “प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0” बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना मे 2016 मध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना एलपीजी सारखे स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केली होती. पारंपारिक इंधनाच्या वापरामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत होती तसेच ग्रामीण महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. म्हणून श्री नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी ही योजना प्रारंभ केली.
सदर योजनेची माहिती-
- शासन ग्रामीण भागातील गरीब कुटुंबीयांना आणि बीपीएल कार्ड कुटुंबातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस कनेक्शन दिले जातात. जेव्हा घरगुती एलपीजी गॅसची किंमत 200 रुपयांनी कमी झाली होती, तेव्हा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी अशी घोषणा केली की केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0 या योजनेअंतर्गत महिलांना 75 लाख मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिले जातील व हे कनेक्शन 3 वर्षासाठी म्हणजेच 2026 पर्यंत दिले जातील. तसेच सरकारने तेल कंपन्यांना 1650 कोटी रुपये देण्याची मान्यता दिली आहे.
- स्थलांतरित कुटुंबीयांना विशेष सुविधेसह PMUY योजनेच्या माध्यमातून 1.6 कोटी एलपीजी कनेक्शनचे अतिरिक्त करण्यात आले. ही लक्षसंख्या डिसेंबर 2022 मध्ये गाठली गेली. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून एकूण कनेक्शनची संख्या 9.6 कोटी एवढी झाली.
- म्हणून भारत सरकारने या योजनेअंतर्गत अतिरिक्त 75 लाख कनेक्शन जारी करण्याची परवानगी दिली आहे. या योजनेचे एकूण लक्ष 10.35 कोटी एवढे आहे.
सदर योजनेचा फायदे-
पीएमयूवाय कनेक्शनसाठी भारत सरकारद्वारे रोख मदत करण्यात येते. (१४.२ किलो सिलेंडरसाठी रु. १६०० / ५ किलो सिलेंडरसाठी रु. ११५०). यात खालील बाबींचा समावेश आहे:
- सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव – १४.२ किलो सिलेंडरसाठी १२५० रु. / ५ किलो सिलेंडरसाठी ८०० रु.
- प्रेशर रेग्युलेटर – १५० रु.
- एलपीजी नळी – १०० रु.
- घरगुती गॅस ग्राहक कार्ड – २५ रु.
- “तपासणी / मांडणी / प्रात्यक्षिक शुल्क – ७५ रु.”
- याव्यतिरिक्त, सर्व पीएमयूवाय लाभार्थ्यांना त्यांच्या ठेवी मुक्त कनेक्शन बरोबर तेल विपणन कंपन्यां (ओएमसी) तर्फे पहिले एलपीजी रीफिल आणि स्टोव्ह (हॉटप्लेट) दोन्ही विनामूल्य प्रदान केले जातील.
सदर योजनेच्या पात्रतेचा निकष-
खालीलपैकी कोणत्याही श्रेणीतील प्रौढ महिला.
- अनुसूचित जातीतील कुटुंबे
- अनुसूचित जनजातीतील कुटुंबे
- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)
- सर्वाधिक मागासवर्गीय
- अंत्योदय अन्न योजना (एएवाई)
- चहा आणि माजी-चहा मळा जमाती
- वनवासी
- बेटांवरील आणि नदी बेटांवरील रहीवासी
- एसईसीसी कुटुंबे (एएचएल टिआयएन)
- १४-कलमी घोषणेनुसार गरीब कुटुंब
- अर्जदाराचे किमान वय १८ वर्षे असावे.
- इतर कोणतेही एलपीजी कनेक्शन एकाच घरात असू नये.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- केवाईसी
- रेशन कार्ड (ज्या राज्यातून अर्ज केला आहे त्या राज्याने जारी केलेले कौटुंबिक रचना प्रमाणित करणारे इतर दस्तऐवज)
- स्वयं-घोषणापत्र (स्थलांतरित अर्जदारांसाठी)
- दस्तऐवजातील क्र.सं. २ मध्ये नमुद केलेल्या लाभार्थी आणि प्रौढ कुटुंबातील सदस्यांचे आधार
- पत्त्याचा पुरावा – आधार ओळखीचा पुरावा समान पत्त्यावर कनेक्शन हवे असल्यास आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार स्विकारले जाईल. म्हणजे फक्त आधार कार्ड पुरेसे आहे.
- बँक खाते क्रमांक आणि आईएफएससी क्रमांक.
नोट-
- सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now