पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना 2024

आपले सरकार हे देशातील शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असते. आज आपण सदर लेखातून किसान विकास पत्र योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येते. या योजनेमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागते व मुदत पूर्ण झाल्यावर दुप्पट रक्कम आपणास दिली जाते. या योजनेत गुंतवणूक केल्यामुळे आपणास पैशांची बचत करण्यास मदत होते जेणेकरून ते आपणास भविष्यात उपयोगी पडतात.

सदर योजनेची माहिती-

  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अर्ज करावा लागतो.
  • या योजनेमध्ये गुंतवणूकदाराला 124 महिने म्हणजेच 10 वर्ष आणि 4 महिन्यांसाठी गुंतवणूक करावी लागते.
  • जेव्हा दिलेला कालावधी पूर्ण होईल त्यानंतर 6.9% व्याजदरानुसार दुप्पट पैसे आपणास मिळतील.
  • ही योजना शेतकऱ्यांबरोबरच इतर सर्व नागरिकांसाठीही सुरू करण्यात आलेली आहे.
  • या योजनेमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराने 1 वर्षाच्या आत पैसे काढले तर त्याला व्याज दिले जात नाही व त्याला दंडही भरावा लागतो.
  • जर गुंतवणूकदाराने प्रमाणपत्र खरेदी केल्यानंतर 1 वर्षांनंतर पैसे काढले तर अशा गुंतवणूकदारास दंड भरावा लागत नाही व व्याजदरही कमी केले जाते.
  • जर गुंतवणूकदाराने 2.5 वर्षानंतर पैसे काढले तर त्याला फक्त 6.9% व्याजदर दिले जाते व त्याला कोणताही दंड भरावा लागत नाही.

सदर योजनेची कमाल व किमान गुतवणूक मर्यादा-

  • या योजनेसाठी फक्त KVP प्रमाणपत्र खरेदी करावे लागते. या योजनेमध्ये किमान गुंतवणूक रु. 1000/- एवढी करावी लागते. या योजनेसाठी कोणतीही मर्यादा सेट केलेली नाही म्हणजेच गुंतवणूकदार त्याला हवी तेवढी गुंतवणूक करू शकतो.
  • जर तुम्ही 50 हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला पॅन कार्डची माहिती द्यावी लागते.

सदर योजनेची वैशिष्ट्ये-

  • या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदार आपले खाते एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये ट्रान्सफर करू शकतो.
  • या योजनेच्या माध्यमातून 6.9% व्याजदर गुंतवणूकदाराला दिले जाते.
  • जर कोणत्याही गुंतवणूकदाराला कर्ज घ्यायचे असेल तर हमी म्हणून ही योजना वापरता येते व त्याला कर्ज देखील मिळू शकते.
  • या योजनेचा फॉर्म चेकद्वारे किंवा रोख भरता येतो.
  • या योजनेचा अर्ज करून झाल्यानंतर लाभार्थ्याला KVP प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्रांमध्ये योजनेची मुदतपूर्ती तारीख, लाभार्थी गुंतवणूकदाराचे नाव, रक्कम इत्यादी माहिती दिलेली असते.

सदर योजनेची पात्रता

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी गुंतवणूकदार हा भारताचा मूळ रहिवासी असावा.
  • फक्त 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीस या योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो.
  • जर गुंतवणूकदार व्यक्ती अल्पवयीन असेल तर त्याचे पालक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात.

सदर योजनेतील प्रमाणपत्राचे प्रकार-

हे प्रमाणपत्र गुंतवणूकदारास पोस्ट ऑफिस किंवा बँकेत मिळणार आहे. ते मिळवण्यासाठी तुम्ही रोख, चेक पे ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे खरेदी करु शकता. या पत्राचे 3 प्रकार आहेत.

  1. सिंगल धारक प्रकार KVP प्रमाणपत्र- अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी यांच्या वतीने एकट्या व्यक्तीकडून हे प्रमाणपत्र खरेदी केले जाऊ शकते.
  2. संयुक्त A प्रकार KVP प्रमाणपत्र- यामध्ये 2 प्रौढ व्यक्ती खरेदी करून गुंतवणूक करू शकतात.
  3. संयुक्त बी प्रकार KVP प्रमाणपत्र- हे प्रमाणपत्र दोन प्रौढ व्यक्ती खरेदी करू शकतात तसेच यामध्ये दोन्ही व्यक्तींपैकी कोणीही गुंतवणूक करू शकते.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • पॅन कार्ड
  • जन्माचा दाखला
  • रहिवाशी दाखला  
  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
  • ई-मेल आयडी
  • अर्ज फॉर्म

सदर योजनेचे पत्र खरेदी करण्याची प्रक्रिया-

  • यासाठी सर्वात प्रथम आपणास जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जावे लागेल. तेथे जाऊन किसान विकास पत्र फॉर्म घ्यावा लागेल.
  • नंतर त्या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व कागदपत्रे भरून जोडून तुम्हाला तो सबमिट करावा लागेल.
  • नंतर तुम्हाला तुमच्या जमा केलेल्या गुंतवणुकीचा रकमेनुसार प्रमाणपत्र दिले जाईल.

सदर योजनेचे पत्र हस्तांतरित करण्याची प्रक्रिया-

  • गुंतवणूकदारास पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेमध्ये जिथून त्याने योजनेसाठी अर्ज केला आहे त्या ठिकाणी जावे लागेल.
  • तेथे गेल्यावर खाते हस्तांतरित करण्यासाठी अधिकाऱ्याकडून फॉर्म घ्यावा लागेल व त्या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल.
  • नंतर तुम्हाला मतदान कार्ड, रहिवासी दाखला, KVP प्रमाणपत्र अर्जासोबत जोडून ते सबमिट करावे लागणार आहे.
  • यानंतरच तुमचे बचत खाते हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

नोट– जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *