आज आपण सदर लेखातून प्रधानमंत्री सूर्योदय योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. आपणास या योजनेचा लाभ कसा घेता येऊ शकतो हे पण पाहू या. काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील 1 कोटी घरांवर रुफ टॉप सोलर सिस्टम बसवण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून 300 युनिट पर्यंत वीज पुरवठा केला जातो. तसेच यासाठी 18000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून 3 किलोवॅट रुफ टॉप सोलर सिस्टम बसवली जाणार आहे. रूफ टॉप सोलर सिस्टममुळे आपल्याला घरामध्ये उपयोगासाठी जी वीज लागते ती 24 तास उपलब्ध होते.
सदर योजनेची पात्रता-
- अर्जदार हा भारताचा स्थानिक रहिवासी असायला हवा.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसायला पाहिजे.
- जर अर्जदार हा BPL(बीपीएल) कार्डधारक असेल तर त्याला अधिक प्राधान्य दिले जाईल.
- अर्जदाराच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी जागा असावी.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- विज बिल
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- राहते घर स्वतःचे असल्याचा ग्रामपंचायत पुरावा
- उत्पन्नाचा दाखला
- स्वयंघोषणा प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
सदर योजनेची अधिकृत वेबसाईट-
या योजनेचा अर्ज करण्यासाठी solarrooftop.gov.in या अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्या.
सदर योजनेची अर्ज करण्याची पद्धत-
- तुमचे राज्य निवडा. तुमची वीज वितरण कंपनी निवडा. तुमचा वीज ग्राहक क्रमांक टाका. मोबाईल नंबर टाका. ई-मेल प्रविष्ट करा. कृपया पोर्टलच्या निर्देशानुसार अनुसरण करा.
- ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉगिन करा. फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा.
- DISCOM कडून मंजुरीची प्रतीक्षा करा. एकदा की मंजूरी मिळाल्यावर तुमच्या डिस्कॉममधील नोंदणीकृत विक्रेत्यांद्वारे प्लांट स्थापित करावा लागेल.
- इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर, प्लांट तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करावा.
- नेट मीटर बसवूण झाल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे तपासणी करुन झाल्यानंतर, ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील.
- तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यानंतर पोर्टलच्या माध्यमातून बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करावा. सबसिडी तुमच्या खात्यात कामकाजाच्या 30 दिवसात येईल.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now
Hi there
My name is Diana Rossenga and I represent Musgrave Group, Ireland’s largest wholesaler. We’re always on the lookout for fresh opportunities that can help expand our offerings while promoting quality products from other companies around the globe.
We find your product line quite impressive and believe it aligns perfectly with our business model.
I’ve been trying to locate your export department with no luck yet. Can you pass this message to your CEO or Export dep.
Mrs Diana Rossenga
Musgrave Group
Cork,
Ireland
Email: bookings@musgraveimports.com