आपले सरकार हे ज्येष्ठ नागरिकांसाठी कायमच संवेदनशील असते. 5 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे राज्याच्या 2023-24 वर्षाच्या सुशासन अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलले की मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना लाभ दिला जाणार आहे.
सदर योजनेची माहिती-
या योजनेच्या माध्यमातून जे ज्येष्ठ नागरिक अपंग व अशक्त आहेत यांना लाभ दिला जातो. यामुळे राज्यातील जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेसाठी 480 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. चला तर मग आपण सदर लेखातून जाणून घेऊया सविस्तर माहिती.
सदर योजनेचा लाभाचे स्वरुप-
- या योजनेचा लाभ 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे.
- ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्याची तपासणी करण्यात येणार आहे.
- लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात एक रकमी रु.3000/- जमा करण्यात येणार आहे.
- केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील ठरावीक जिल्ह्यात राबवण्यात येते. मात्र मुख्यमंत्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे–
- आधार कार्ड/मतदान कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
- स्वयं-घोषणापत्र
- शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे
नोट-
- मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दल शासनाचा काही GR व ऑनलाइन फॉर्म भरण्याची लिंक आली तर आपण आपल्या लेखातून आपणास त्याची माहिती देऊ.
- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now