आज आपण सदर लेखातून राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून शास्त्रीय पद्धतीने देशी पशुपालन आणि संवर्धनाला चालना देण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. चला तर मग या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सदर योजनेच्या लाभाचे स्वरूप –
- २०० देशी व संकरीत पशुधन संगोपन करणे व त्यासाठी शेड बांधणी करण्यात येते.
- या योजनेची प्रकल्प किंमत रुपये 4 कोटी एवढी आहे.
- या योजनेच्या माध्यमातून रुपये 2 कोटी एवढे अनुदान देण्यात येते.
सदर योजनेची पात्रता –
- अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असावे.
- या योजनेसाठी फक्त लहान शेतकरी आणि पशुपालक अर्ज करू शकतात.
- सरकारी निवृत्ती वेतन घेणाऱ्या पशुपालकांना आणि शेतकऱ्यांना लाभ घेता येणार नाही.
- स्वतःची किमान 5 एकर जमीन किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली जमीन असणे आवश्यक आहे.
सदर योजनेचा अर्ज कोठे करावा? –
राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ येथे जाऊन या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा.
- नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now