प्रधानमंत्री सूर्योदय योजना माहिती 2024

सदर योजनेची माहिती-

   22 जानेवारी 2024 रोजी राम लल्लाच्या मूर्तीची स्थापना, प्राणप्रतिष्ठा प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. प्रधानमंत्री मोदी यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर एका नवीन योजनेची घोषणा केली. या योजनेचे नाव प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 असे आहे.

   या योजनेच्या माध्यमातून 1 कोटी घरांवर सोलर पॅनल उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. चला तर मग आपण सदर लेखातून याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. या योजनेच्या माध्यमातून गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना विज बिलावरील होणाऱ्या खर्चात बचत होण्यास मदत मिळणार आहे. तसेच ऊर्जा क्षेत्रात भारत स्वालंबी बनवण्यास देखील मदत होणार आहे.

सदर योजनेचे फायदे-

  • जर घरावरती रूफ टॉप सोलर सिस्टिम बसवली तर वीज बिलाचे पैसे भरावे लागणार नाही.
  • त्यामुळे गरजू व गरीब जनतेचा कमाईचा जास्त हिस्सा वीज बिल भरण्यात जाणार नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून जर घरावरती सोलर सिस्टिम बसवली असेल तर शासन ती  विज खरेदी करून त्याबद्दल त्यावरती मोबदला म्हणून घर मालकाला आर्थिक मदत देते.
  • या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशातील विजेची बचत होण्यास मदत होईल व भविष्यात विजेचा तुटवडा निर्माण होणार नाही.

सदर योजनेची अर्ज करण्याची पद्धत-

  या योजनेसाठी अजून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. परंतु पुढच्या आठ दिवसांमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती सादर केली जाणार आहे.  जेव्हा अर्ज प्रक्रिया सुरू होईल तेव्हा सदर लेखातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *