आपले सरकार हे दरमहा बीपीएल कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे मोफत धान्य देत असते. अशा बीपीएल कुटुंबांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. ज्या कुटुंबांचे रेशन कार्ड हे बीपीएल मध्ये आहे अशा सर्वांनी आपले रेशन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. म्हणजेच आपल्या रेशन कार्ड मधील कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे.
रेशन कार्डला आधार कार्ड मोफत लिंक करून घेता येते. जर तुम्ही अजून रेशन कार्डशी आधार कार्ड लिंक केले नसेल तर लगेच करून घ्या. सरकारने आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 ही ठेवली आहे. ही तारीख सरकारने 6व्या वेळी वाढवली आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत 31 डिसेंबर पर्यंत रेशन कार्डशी आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे व ते ही न चुकता, तुम्ही हे लिंक करून घ्या.
जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला राशन मिळणार नाही. जे राशन विक्रेते आहे त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही आधार लिंक करून घेऊ शकता. सरकार 2029 पर्यंत देशातील लोकांना मोफत राशन देणार आहे. ही घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. म्हणजेच सरकार मोफत रेशन हे 5 वर्षासाठी देणार आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.