शरद पवार ग्राम समृद्धी योजना माहिती 2024

  आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर जे लोक गाय-म्हैस पाळतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आज आपण या लेखातून गाय- म्हैस शेड अनुदान योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत. ही योजना ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येते.

   या योजनेच्या माध्यमातून 100% अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेसाठी 18 जानेवारीपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. जर या योजनेच्या माध्यमातून शेड मंजूर झाले तर काम पूर्ण झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत कुक्कुटपालन शेडमध्ये 100 पक्षी असणे बंधनकारक आहे.

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या इतर बाबी

1) गाय-म्हैस पक्का गोठा

2) शेळीपालन शेड

3) कुक्कुटपालन शेड

4) भू-संजीवनी कंपोस्टिंग

1) गाय-म्हैस पक्का गोठा अनुदान-

  • या योजनेसाठी अकुशल खर्च हा रु.6,018/- याप्रमाणे 8% दिला जातो.
  • तसेच कुशल खर्च हा रु.71,000/- याप्रमाणे 92% दिला जातो.
  • म्हणजेच एकूण खर्च हा रु.77,188/- याप्रमाणे 100% दिला जातो.

2) शेळीपालन शेड बांधणी अनुदान योजना-

  • या योजनेसाठी अकुशल खर्च हा रु.4,284/- याप्रमाणे 8% दिला जातो.
  • तसेच कुशल खर्च हा रु.45,000/- याप्रमाणे 92% दिला जातो.
  • म्हणजेच एकूण खर्च हा रु.49,284/- याप्रमाणे 100% दिला जातो.

3) कुक्कुटपालन शेड अनुदान योजना-

  • या योजनेसाठी अकुशल खर्च हा रु.4,760/- याप्रमाणे 10% दिला जातो.
  • तसेच कुशल खर्च हा रु.45,000/- याप्रमाणे 90% दिला जातो.
  • म्हणजेच एकूण खर्च हा रु.49,760/- याप्रमाणे 100% दिला जातो.

4) भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग-

  • या योजनेसाठी अकुशल खर्च हा रु.4,064/- याप्रमाणे 38% दिला जातो.
  • तसेच कुशल खर्च हा रु.6,491/- याप्रमाणे 62% दिला जातो.
  • म्हणजेच एकूण खर्च हा रु.10,537/- याप्रमाणे 100% दिला जातो.

सदर योजनेची कागदपत्रे

  • 7/12 व 8 अ उतारा
  • भूमिहीन/अल्पभूधारक शेतकरी/अपंग/ BPL
  • जनावरांचा गोठा/शेळ्यांची संख्या
  • यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचा लाभ न घेतलेले प्रमाणपत्र
  • प्रस्तावित जागेचा GPS फोटो
  • उपलब्ध पशुधन यांचे GPS मध्ये टॅगिंग फोटो
  • जॉब कार्ड
  • बँक पासबुक
  • आधार कार्ड
  • ग्रामपंचायतचे मागणी पत्र

नोट-

  • सदर योजनेचा अर्ज ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती यांच्याकडे सादर करावा.
  • जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *