महिला बचत गट ड्रोन अनुदान योजना माहिती 2023

आज आपण सदर लेखातून महिला बचत गट ड्रोन अनुदान योजना याबद्दलची माहिती पाहणार आहोत. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे राबविण्यात येणार आहे.

   हे ड्रोन खरेदी करण्यासाठी ड्रोनच्या किमतीच्या 80% इतकी रक्कम केंद्रीय आर्थिक सहाय्य आणि इतर साधने खरेदी करण्याचा अनुषंगाने शुल्क म्हणून दिले जाणार आहे. यासाठी कमाल 8 लाख रुपये महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी दिले जाणार आहेत.

सदर योजनेचे उद्दिष्ट-           

  • या योजनेच्या माध्यमातून सन 2023-24 ते 2025-26 या कालावधीत 15000 निवडक महिला बचत गटांना कृषी वापरासाठी ड्रोन देण्यात येणार आहेत.
  • हे ड्रोन महिला बचत गटाकडून शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत.
  • कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान वापरले जाईल व त्याचबरोबर महिला बचत गटांचे सक्षमीकरण होईल या दृष्टिकोणाने ही योजना राबवण्यात येणार आहे.

सदर योजनेचे वैशिष्ट्ये-

  • ही योजना कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, ग्रामीण विकास विभाग आणि खते विभाग, महिला स्वयंसहायता गट आणि प्रमुख कंपन्या यांची संसाधने आणि प्रयत्नांचे एकत्रीकरण करून सर्वांना चालना देणारी आहे.
  • ज्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या ड्रोनचा वापर अनिवार्य असेल, अशा क्लस्टर्स शोधून काढून वेगवेगळ्या राज्यांमधील प्रगतीशील 15000 महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवण्यासाठी निवडले जाईल.
  • 18 आणि त्याहून अधिक वयाच्या महिला बचत गटांच्या सदस्यांपैकी एका सदस्याची निवड राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एलएफसी द्वारे 15 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी केली जाते. यामध्ये 5 दिवसाचे अनिवार्य ड्रोन पायलेट प्रशिक्षण आणि अतिरिक्त कीटकनाशक फवारणीच्या 10 दिवसांच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे.
  • तसेच महिला बचत गटातील इतर सदस्य म्हणजेच कुटुंबातील सदस्य ज्यांना इलेक्ट्रिकल वस्तूची दुरुस्ती, फिटिंग आणि यांत्रिक कामे करण्याची इच्छा आहे. त्यांची निवड राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एलएफसी द्वारे केली जाते. अशा लोकांना ड्रोन तंत्रज्ञ सहाय्यक म्हणून प्रशिक्षित केले जाते.
  • हे प्रशिक्षण ड्रोनच्या पुरवठ्यासह पॅकेज म्हणून दिले जाते. ड्रोन कंपनी द्वारे ड्रोन खरेदी करण्यास, ड्रोनची दुरुस्ती करण्यास व देखभाल करण्यास बचत गटांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ड्रोन पुरवठादार कंपन्या आणि बचत गट यांच्यातील मध्यस्थी म्हणून एलएफसी काम करतील.
  • एलएफसी याद्वारे नॅनो युरिया आणि नॅनो खतासारख्यांच्या स्वयंसाहायता गटासोबत ड्रोन द्वारे वापराला प्रोत्साहन देतील. स्वयंसहायता गट शेतकऱ्यांना नॅनो खतासाठी आणि कीटकनाशकांच्या वापरासाठी ड्रोन सेवा भाडेतत्त्वावर देतील.
  • महिला बचत गटांना शाश्वत व्यवसाय आणि उपजीविकेचे साधन मिळाल्यामुळे आर्थिक आधार मिळेल, तसेच त्यावर्षी किमान 1 लाख रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल.
  • अद्यावत सुधारणा तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी, पीक उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतीचा कामांचा खर्च कमी करण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांना सहाय्यक ठरणार आहे.

नोट-जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *