सदर योजनेचा उद्देश–
- महाराष्ट्र सरकारद्वारे मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात येत आहे.
- पिवळ्या व केशरी रेशनकार्ड कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्या-टप्प्यांमध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील.
सदर योजनेची लाभार्थी पात्रता-
- पिवळ्या व केशरी रेशनकार्ड कुटुंबात जन्म झालेल्या मुलींना याचा लाभ मिळणार आहे.
- या योजनेचा लाभ 1 एप्रिल 2023 व त्यानंतरच्या जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू असणार आहे.
सदर योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप-
मुलीचा जन्म झाल्यावर | रु. 5000/- |
मुलगी पहिलीत गेल्यावर | रु. 6000/- |
मुलगी सहावीत गेल्यावर | रु. 7000/- |
मुलगी अकरावीत गेल्यावर | रु. 8000/- |
मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर | रु. 75,000/- |
एकूण लाभ | रु, 1,0,1000/- |
सदर योजनेच्या अटी व शर्ती-
- ही योजना पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील.
- एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहते.
- पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
- तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. पण त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. 1 लाख पेक्षा जास्त नसावे.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- लाभार्थी आधार कार्ड (प्रथम लाभाच्या वेळी ही अट शिथिल राहील.)
- पालकाचे आधार कार्ड
- रेशन कार्ड (पिवळा किंवा केशरी)
- बँक पासबुक झेरॉक्स
- लाभार्थ्याचा जन्माचा दाखला
- तहसीलदाराचे कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला
- मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरीता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर)
- संबंधित टप्प्यावरील लाभाकरीता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
- अंतिम लाभाकरीता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.
सदर योजनेसाठी अर्ज कसा भरावा-
- आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच तेथून अर्ज देखील करू शकता.
- सदर अर्जात तुमची वैयक्तिक माहिती म्हणजे मोबाईल नंबर, पत्ता, मुलीची माहिती, बँक खात्याची माहिती देऊन भरून तुम्ही हा अर्ज करू शकता.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.