- आज आपण शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सदर लेखातून जाणून घेणार आहोत. या निर्णयांमध्ये बारावीनंतर मुलींना शिक्षण घ्यायचे असेल तर ते शिक्षण मोफत घेता येणार आहे. ही घोषणा महाराष्ट्र राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये जाहीर करण्यात आली आहे.
- याबद्दल बोलताना मंत्री चंद्रकांतजी पाटील हे म्हणाले की 1 जून 2024 नंतर कोणत्याही मुलींना जर शिक्षण घ्यायचे असेल तर ते शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व मुलींसाठी ही योजना 1 जून 2024 नंतर लागू होणार आहे.
- लवकरच या संबंधित शासन निर्णय जाहीर केला जाईल व तसेच यासंदर्भातील परिपत्रक महाराष्ट्रातील सर्व शिक्षण विभाग व कॉलेज यांना दिले जाईल.
मोफत शिक्षणाचे कोणते कोर्स असणार आहेत ते जाणून घेऊयात-
- बी फार्म (B. Pharm)
- डी फार्म (D. Pharm)
- लॉ (law)
- इंजिनिअरिंगची कोणतीही पदवी (Engg.)
- मेडिकल (Medical)
- बायोटेक (Bio-Tech)
- त्याचबरोबर इतर क्षेत्रांमध्ये मुली शिक्षण घेत असतील तर त्यांना देखील मोफत शिक्षण दिले जाणार आहे.
नोट-
- मोफत कोर्स बाबत जर शासनाने कोणताही जीआर उपलब्ध करून दिला तर तो आम्ही सदर लेखातून आपल्यापर्यंत पोहोचू किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून आपण माहिती मिळवू शकता.
- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now