श्रीराम प्राणप्रतिष्ठ प्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप…

आज आपण सदर लेखातून आनंदाचा शिधा वाटप याबद्दलची माहिती पाहणार आहोत. या शिध्याचे वाटप महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत केले जाणार आहे. या शिधापत्रिकेच्या माध्यमातून सहा वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.

लाभार्थी पात्रता-

  • ज्या लाभार्थ्याकडे अंत्योदय अन्न योजना शिधा पत्रिका आहेत ते पात्र असतील.
  • प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका आहे ते देखील पात्र असतील.
  • तसेच छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील म्हणजेच (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी.

देण्यात येणारा शिधा-

  • साखर- 1 किलोग्रॅम
  • खाद्य तेल- 1 लिटर
  • चणाडाळ- अर्धा किलोग्रॅम
  • रवा- अर्धा किलोग्रॅम
  • मैदा- अर्धा किलोग्रॅम
  • पोहे- अर्धा किलोग्रॅम

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *