आज आपण सदर लेखातून मुलींसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वपूर्ण असणाऱ्या योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत. मुलींना सायकल वाटप अनुदान योजनेच्या माध्यमातून सायकल वाटप केली जाते. त्याचबरोबर आता या योजनेमध्ये शासनाने काही बदल केले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती.
सदर योजनेची माहिती–
या योजनेतंर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये देखील सरकारने आता वाढ केली आहे. अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाकडून दिनांक 16 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसारित करण्यात आलेला आहे. गेल्या काही वर्षापासून सायकलच्या किमतीत वाढ होत असल्याकारणाने शासनाने अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाच्या असे निदर्शनास आले की जे अनुदान मुलींच्या सायकल खरेदी करण्यासाठी देत आहोत, त्या अनुदानात मुलींना चांगल्या दर्जाची सायकल घेता येत नाही. त्यामुळे आता या अनुदानात वाढ केली गेली आहे.
सदर योजनेची पात्रता-
- या योजनेच्या माध्यमातून शाळेपासून 5 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या व इयत्ता 8 ते 12 पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना सायकलचे वाटप केले जाते.
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलगी ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी.
सदर योजनेच्या माध्यमातून मिळणारे अनुदान-
या योजनेच्या माध्यमातून प्रति लाभार्थी रु. 5,000/- एवढे अनुदान देण्यात येते व त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने केले जाते. तसेच हे अनुदान डीबीटी च्या साह्याने थेट बँक खात्यात जमा केले जाते.
- पहिला टप्पा- रु. 3,500/- अगोदर रक्कम DBT च्या साह्याने राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जमा करण्यात येईल. डीबीटी च्या साह्याने राष्ट्रीयकृत बँकेमध्ये
- दुसरा टप्पा– रु. 1,500/- जेव्हा लाभार्थी मुलीने सायकल खरेदी केल्यानंतर सायकल खरेदीची पावती व उर्वरित कागदपत्रे जमा केल्यावर देण्यात येईल.
सदर योजनेच्या पात्रतेच्या अटी-
- शासकीय अनुदानित शाळा
- शासकीय शाळा
- जिल्हा परिषद शाळा
- ज्या अनुदानित व शासकीय आश्रम शाळेतील मुलींना डे स्कॉलर प्रवेश दिला जातो अशा मुली
- ज्या मुलींना दररोज घरापासून ये जा करावे लागते अशा शाळेतील मुली
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- राशन कार्ड
- मोबाईल नंबर
- बँक खाते पासबुक झेरॉक्स
- सायकल खरेदी पावती
- पासपोर्ट साईज फोटो
- शाळेचे प्रमाणपत्र (इयत्ता 8वी ते 12वी मध्ये शिकत असल्याचे)
नोट- जर वरील माहिती आपणास आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.