ठिबक सिंचन अनुदान योजना माहिती 2023

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांना उपयुक्त अशा शासनाच्या ठिबक सिंचन योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरते. ठिबक सिंचनचा वापर केल्यामुळे कमी पाण्यातही पिकांना पाणी देता येऊ शकते.

सदर योजनेची माहिती

   ही योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या प्रति थेंब– अधिक पीक’ या घटकाच्या माध्यमातुन  राबवली जाणारी योजना आहे. ही योजना सन 2015-16 पासून राबवली जात आहे. ही एक आधुनिक सिंचन प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये झाडांच्या मुळाला थेंब-थेंब पाणी लहानशा नळीद्वारे दिले जाते. नळीद्वारे थेंब-थेंब पाणी दिल्यामुळे झाडांच्या मुळापर्यंत पाणी जाते व त्यामुळे त्यांना जेवढे पाणी हवे आहे अगदी तेवढ्या प्रमाणात या माध्यमातून पाणी मिळते.

   या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य हे ठिबक सिंचन प्रणालीच्या वापरासाठी आग्रेसर  आहे. कारण फक्त महाराष्ट्र राज्यात या सिंचनाचा 60% वापर केला जातो.

सदर योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम-

  • या योजनेच्या माध्यमातून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% अनुदानास 25% पूरक अनुदान देऊन एकूण 80% अनुदान दिले जाते.
  • इतर शेतकऱ्यांना 45% अनुदानास 30% पूरक अनुदान देऊन एकूण 75% अनुदान दिले जाते.

सदर योजनेच्या अटी व पात्रता-

  • जर एखाद्या शेतकऱ्याने सन 2016-17 च्या अगोदर अशा एखाद्या योजनेचा लाभ घेतला असेल, तर पुढील 10 वर्ष तरी अशा सर्वेनंबरसाठी शेतकऱ्याला योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेचा लाभ फक्त 5 हेक्टर क्षेत्रासाठीच मर्यादित आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर शेतकऱ्याने सिंचन प्रणाली विकत घेण्यासाठी अगोदर मंजुरी घेतल्यापासून ते अधिकृत विक्रेत्याकडून सिंचन खरेदी करून झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्याच्या पावत्या अपलोड कराव्यात.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • 7/12 उतारा व 8अ उतारा
  • अनुसूचित जाती जमातीसाठी जातीचा दाखला
  • लाईट बिल

नोट-

  • अधिक माहितीसाठी व त्याचबरोबर अर्ज दाखल करण्यासाठी  mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login  या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.
  • जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *