ST बसने सवलतीच्या दरामध्ये प्रवास करण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे. तसेच शेवटची तारीख देखील देण्यात आलेली आहे. या संदर्भातील परिपत्रक देखील महामंडळाच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे. हे कार्ड नाही काढले तर तुम्हाला कोणत्याही सवलतीचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला फुल तिकीट भरावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर NCMC कार्ड काढून घ्यावे. चला तर मग जाणून घेऊया एसटी महामंडळाच्या माध्यमातून नक्की काय परिपत्रक काढण्यात आले आहे व याची शेवटची तारीख काय आहे.
डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला जेष्ठ नागरिक व अमृत जेष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC कार्ड बंधनकारक करण्यात आलेले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. हे परिपत्रक 12 जून रोजी काढण्यात आलेला आहे. राज्यामध्ये सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केलेली आहे व त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. उरलेल्या नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येतील. त्यामुळे लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
NCMC स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला आहे. स्मार्ट कार्ड विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येईल व अशा केंद्राचा वितरण परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल असे स्पष्ट सांगितण्यात आले आहे. आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल की हे कार्ड आपण घरी बसल्या काढू शकतो का? हे कार्ड घरी बसल्या काढता येत नाही. हे कार्ड फक्त तुम्ही डेपोमध्ये जाऊन किंवा तुमच्या शेजारील अधिकृत एजंटकडे जाऊन काढू शकता.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

