डिजिटल जनगणना कशी करावी?

राज्यामध्ये 1 मेपासुन राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. यावेळी प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. हा टप्पा ऐच्छिक असणारा आहे. 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन स्वतःच्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरता येणार आहे. राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी गुरुवारी ही माहिती दिलेली आहे. देशातील ही पहिली पूर्णतः डिजिटल जनगणना ठरणार आहे. नागरिकांच्या सहभागाला यामध्ये विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे . यशस्वी जनगणना प्रक्रिया होण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

स्व-गणना कशी कराल?-

स्वगणना करण्यासाठी या अधिकृत संकेतस्थळावरती जावे. एका कुटुंबासाठी एकच अर्ज असणार आहे. एकूण 33  प्रश्नांची माहिती भरावी लागणार आहे. ती अचूक भरावी. कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. माहिती पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला 11 अंकी युनिक आयडी मिळेल. हा आयडी पुढील पडताळणीसाठी जतन करून ठेवणे गरजेचे आहे.

घरगणना कधी?-

16 मे ते 14 जून 2026 या कालावधीमध्ये जनगणना अधिकारी घरोघरी जाऊन घरगणना करतील. स्व-गणना केली आहे त्यांच्या माहितीची पडताळणी करण्यात येईल. यावेळी युनिक आयडी दाखवणे गरजेचे असेल. तर स्व-गणना न केलेल्या नागरिकांची माहिती अधिकारी स्वतः भरून घेतील.

महत्त्वाच्या सूचना-

  • फक्त या se.census.gov.in अधिकृत वेबसाईटवरतीच माहिती भरावी.
  • कोणतीही संशयस्पद लिंक एसएमएस किंवा ई-मेलवरून माहिती भरणे टाळावे. 
  • जनगणनेसाठी कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही.
  • वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सावधानगिरी बाळगावी.

या जनगणनेच्या यशस्वीतेसाठी नागरिकांनी स्वयंपूर्ण सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *