रेशन कार्डमध्ये घर बसल्या कुटुंबातील नवीन सदस्यांची नावे कशी जोडावीत?

आज आपण सदर लेखाच्या माध्यमातून रेशन कार्ड संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्डमध्ये कसे जोडावे, असा प्रश्न पडला असेल तर चिंता करू नका. याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. रेशन कार्डमध्ये किंवा शिधापत्रिकेमध्ये जर नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचे असेल तर त्यासाठी उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, बँक खात्याचे पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक गरजेचा असतो. तसेच नवीन सुनेचे नाव जोडायचे असेल तर तिचे आधार कार्ड व लग्नाचा दाखला गरजेचा आहे. नवीन मुलाचे नाव जोडायचे असेल तर मुलाचा जन्म दाखला गरजेचा आहे. 

रेशन कार्डमध्ये ऑनलाईन नाव जोडण्याची प्रक्रिया-

  • रेशन कार्डमध्ये ऑनलाईन नाव जोडण्यासाठी अधिकृत वेबसाईटवरती जाण्यासाठी येथे क्लिक करावे.
  • तेथे साइन इन किंवा रजिस्टर या पर्यायावरती क्लिक करावे.
  • त्यातील ‘Public Login’ या पर्यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर जर नोंदणी नसेल तर नवीन युजर आयडी तयार करून लॉगिन करायचे आहे.
  • आता पुढे ज्यांच्या नावावरती रेशन कार्ड आहे त्यांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व ओटीपी टाकून व्हेरिफाय करायचे आहे. त्यानंतर डाव्या बाजूला भरपूर सगळे पर्याय दिसतील त्यातील ‘Ration Card Modification’ या पर्यायावर क्लिक करावे.
  • आता पुढे ‘Add Member’ या बटनावरती क्लिक करायचे आहे.
  • आता ओपन झालेल्या फॉर्ममध्ये सदस्यांच्या नावाची नोंदणी करायची आहे व संपूर्ण माहिती भरायची आहे.
  • नवीन सदस्यांचे नाव, आधार नंबर व जन्मतारीख अचूक भरायची आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर ‘Save’ या बटनावरती क्लिक करायचे आहे व वरती ‘Yes’ आणि ‘Ok’ या बटनावरती क्लिक करायचे आहे.
  • आता आपल्यासमोर सर्व कुटुंबातील व्यक्तींची नावे दिसतील व आपण नवीन नाव Add केले आहे ते पण खाली दिसणार आहे. त्यामध्ये सर्व माहिती बरोबर आहे की नाही हे चेक करायची आहे.
  • सर्व माहिती बरोबर असेल तर खाली ‘Confirm and Proceed to Submit the Application Fee’ या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
  • आता ही माहिती अधिकारी व्हेरिफाय करतील. सर्व माहिती योग्य असेल तर हा फॉर्म 30 दिवसांमध्ये स्वीकारला जाईल.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *