मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. चला तर मग सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया याबद्दलची माहिती. ई-केवायसी प्रक्रियेतील त्रुटींमुळे अनेक महिलांना लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्यामुळे आता लाडकी बहीण संदर्भातील तक्रारी व शंकांचे निरसन करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक राज्य शासनाद्वारे जारी करण्यात आला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील तक्रारींसाठी महिलांना हेल्पलाइन क्रमांकवर संपर्क करण्याचे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केलेले आहे.
ई-केवायसी प्रक्रिया करत असताना चुकीचा पर्याय निवडल्याने अनेक महिलांचा लाभ स्थगित झालेला आहे. तसेच इतर तक्रारी व शंकांचे निरसन करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाइन क्रमांकवर मदत करण्यात येणार आहे. महिलांच्या शंकांचे निरसन करण्यासंदर्भात कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित सर्व तक्रारी व शंकांचे निरसन या क्रमांकावर कॉलवर करण्यात येईल. सर्व लाडक्या बहिणींनी या हेल्पलाइन सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा असे आदिती तटकरे यांनी म्हटलेले आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवण्यात येते. या योजनेची ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
परंतु ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ स्थगित करण्यात आलेला होता. आता या तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांकडून प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनेक लाभार्थी महिलांना नोव्हेंबर व डिसेंबरमधील हप्ता मिळालेला नाही. ई-केवायसी करताना चुकीच्या पर्यायामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ स्थगित झाल्यामुळे अनेक लाडक्या बहीणी रस्त्यावर उतरल्या होत्या. शेवटी यावर राज्य शासनाकडून पडताळणी करून लाभ दिला जाणार आहे, असे सांगण्यात आलेले आहे. तर डिसेंबर महिन्याचा लाभ 14 जानेवारीला महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

