आज आपण सदर लेखातून ट्रॅक्टर अनुदान योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. आपले सरकार ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून 50 टक्के किंवा 1.25 लख रुपयांपर्यंत अनुदान देत असते. यासाठी तुम्ही आता ऑनलाईन अर्ज करू शकता. या योजनेचा अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यास प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावर निवड केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया. ट्रॅक्टर अनुदान योजनाही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.
सदर योजनेसाठीचा अर्ज करण्याची प्रक्रिया-
- अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर कृषी विभागाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आहे.
- त्यातील “वैयक्तिक शेतकरी” या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
- त्यामध्ये फार्मर आयडी प्रविष्ट करायचा आहे व ओटीपी पाठवा या ठिकाणी क्लिक करायचे आहे.
- जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी येईल तो ओटीपी त्या रकान्यात टाकून “ओटीपी तपासा” या बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर नवीन नोंदणी करा किंवा आधीच नोंदणी केली असेल तर “लॉगिन” करायचे आहे.
- आता पुढे “घटकांसाठी अर्ज करा” हा डाव्या बाजूला दुसरा पर्याय आहे, या ठिकाणी क्लिक करावे.
- त्यामध्ये आवश्यक ती माहिती व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- सर्वात शेवटी अर्ज सबमिट करायचा आहे व अर्जाची पोहोच पावती काढून घ्यायची आहे.
सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- 7/12 उतारा
- 8अ उतारा
- बॅंक पासबुक
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला (जर लागू असल्यास)
- ट्रॅक्टर खरेदीचे अंदाजपत्रक
- इतर आवश्यक कागदपत्रे (कृषी विभागानुसार)
सदर योजनेच्या महत्त्वाच्या बाबी-
- ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा संगणकाचा वापर करु शकता किंवा जवळच्या सीएससी सेंटरवरती जाऊन अर्ज भरू शकता.
- अनुदानाचे प्रमाण ट्रॅक्टरच्या क्षमतेनुसार वेगवेगळे असते. उदा. 8 HP ते 20 HP साठी 40% किंवा रु.75,000, 20 HP ते 40 HP साठी 45% किंवा रु.1,00,000, 40 HP ते 70 HP साठी 50% किंवा रु.1,25,000 एवढे अनुदान देण्यात येते.
- अर्ज भरण्याअगोदर योजनेच्या अटी व शर्ती व्यवस्थित वाचाव्यात.
- अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे बरोबर ठेवावीत.
- अर्ज भरताना कोणतीही चुकीची माहिती देऊ नये.
- अर्ज भरल्यानंतर त्याची पोहोच पावती भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवावीत.
- अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
WhatsApp Group
Join Now