यंदाच्या खरीप हंगामामधील पिक विमा अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. राज्य शासनाने यंदा एक रुपयात पिक विमा योजना बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक विम्यासाठी पैसे भरावे लागणार आहेत. पीक विम्याचे निकषही सरकारकडून बदलण्यात आलेले आहेत. यंदाच्या खरिपामधील पिकांसाठीचे विमा अर्ज शेतकऱ्यांनी लवकरात लवकर भरण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे. पिक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड महत्त्वाचे आहे. फार्मर आयडी कार्ड नसेल तर अशा शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आयडी कार्ड काढलेले नाही त्यांनी लवकरात लवकर अॅग्रीस्टॅक योजनेमध्ये नाव नोंदवून फार्मर आयडी कार्ड काढून घ्यावे. पिकांच्या पेरणीपासून काढणीपर्यंत विविध नैसर्गिक घटकांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विमा भरपाई दिली जाते. त्यामध्ये पावसामधील खंड, कीड, रोगांचा प्रादुर्भाव, पीक कापणी प्रयोगाद्वारे येणारे सरासरी उत्पन्न अशा वेगवेगळ्या निकषांचा समावेश करण्यात आलेला आहे. पिक विमा अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 ही आहे. खरीप 2025 प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी pmfby.gov.in या लिंक वरती क्लिक करावे.
पिक विमा योजनेमध्ये समाविष्ट असलेली पिके-
भात, नाचणी, ज्वारी, बाजरी, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, भुईमूग, कारळे, मूग, कांदा, तीळ व तूर पीक निहाय व जिल्हा निहाय विमा संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता यामध्ये फरक असतो.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.