पर्सनल लोन हे सर्वात पटकन व कमी कागदपत्रांमध्ये मिळणारे एकमेव असे कर्ज आहे. अलीकडे वैयक्तिक कर्ज घेण्याचे प्रमाण हे खूप वाढलेले आहे. त्यामुळे आता बँकांसोबत विविध वित्तीय संस्थादेखील पर्सनल लोन देत आहेत. एवढेच नाही तर डिजिटल वॉलेट गुगल पे ने देखील पर्सनल लोन देण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आता गुगल पे विविध बँकाच्या भागीदारीतून 30 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत त्वरित वैयक्तिक कर्ज देणार आहे. कर्जाचा कालावधी हा 6 महिने ते 5 वर्षापर्यंत असणार आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया तुम्हाला किती व्याज द्यावे लागणार आहे? अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे? याबद्दलची सविस्तर माहिती.
गुगल पे किती व्याज आकारते-
जर तुम्ही गुगल पे वरून कर्ज घेत असाल तर तुम्हाला 10.50% ते 15% पर्यंत व्याज द्यावे लागणार आहे. क्रेडिट स्कोअरच्या आधारे व्याजदर ठरवण्यात येतो. कर्ज घेण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असणार आहे. त्यासाठी कोणतेही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय किमान 21 वर्ष असावे. तसेच नियमित उत्पन्नाचा स्रोत त्या व्यक्तीकडे असावा. तुमच्या बँक खात्यामधून EMI पेमेंट कापले जाणार आहे.
कर्जासाठी अर्ज कसा करावा?-
- अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर गुगल पे ॲप उघडायचे आहे व त्यातील मनी टॅबवर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर कर्ज विभागात उपलब्ध असलेल्या ऑफर्स पहायच्या आहेत.
- उपलब्ध ऑफरवर क्लिक करायचे आहे व सूचनांचे पालन करायचे आहे.
- केवायसी कागदपत्रे अपलोड करायची आहेत व कर्ज करारावर ई-स्वाक्षरी करायची आहे.
- कर्ज मंजूर झाल्यानंतर रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
कर्ज भरण्याची प्रक्रिया-
गुगल पेद्वारे कर्जाचा मासिक ईएमआय थेट तुमच्या लिंक केलेल्या मोबाईल बँक खात्यातून कापला जाणार आहे. म्हणून दंड टाळण्यासाठी पुरेसा शिल्लक निधी बँक खात्यामध्ये असणे गरजेचे आहे. कर्ज अर्ज करताना परतफेडीचे वेळापत्रक त्याचबरोबर देयतारखा व रकमेसह सर्व माहिती दिलेली असते.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.