महाराष्ट्र राज्यांमध्ये त्याच बरोबर अनेक राज्यांमध्ये सध्या ‘अपात्र शिधापत्रिका रद्द करण्याची मोहीम’ सुरू करण्यात आलेली आहे. शासनाकडून ‘अपात्र लाभार्थ्यांची शिधापत्रिका रद्द’ करण्यासाठी तपासणी व शोध मोहीम राबवण्यात येत आहे. राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरित करताना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत दिनांक 29-6-2013 च्या शासन निर्णयांमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत. दि. 1 फेब्रुवारी 2014 पासून राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमन, 2013 ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यानुसार अन्नसुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना असे दोन गटात लाभार्थ्यांचे विभाजन केले गेले आहे.
अंत्योदय अन्य योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी केंद्र शासनाने वेळोवेळी राज्य शासनाला केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शासन निर्णय दि. 17-7-2013 व शासन शुद्धिपत्रक दि. 14-11-2013 याप्रमाणे पात्र लाभार्थ्यांचे निकष निश्चित करण्यात आलेले आहेत. तसेच प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे निकष दि. 17-12-2013 च्या शासन निर्णयामध्ये निश्चित करण्यात आलेले आहेत. नवीन शिधापत्रिका देण्याअगोदर अर्जदारांचे उत्पन्न तपासण्याची कार्यपद्धती दि. 4-2-2014 च्या शासन निर्णयांमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. आता अंत्योद्य अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना गटातील उत्पन्न तपासण्यासाठी नवीन हमीपत्र बंधनकारक करण्यात आलेले आहे.
शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये राज्याची 700.16 लक्ष लाभार्थी संख्या पूर्ण झाल्यामुळे नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित, मयत लाभार्थ्यांना प्राधान्याने वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी राज्यात दि.1-2-2021 ते 31-4-2021 या कालावधीत अपात्र शिधांपत्रिकांचा शोध मोहिम राबवण्याबाबत दि. 28-1-2021 च्या शासन निर्णयानुसार सूचना देण्यात आलेल्या होत्या. तथापि प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम राबवण्यात दि. 1-4-2021 चा आदेशानुसार स्थगिती देण्यात आली. आता अपात्र शिधापत्रिकांचा शोध मोहीम राबविताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडीअडचणी विचारात घेऊन सदर मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबवण्याच्या प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता.
अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम-
केंद्र शासनाकडून या अगोदर प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत. लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. सध्यास्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी (केशरी) व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी दि. 1 एप्रिल ते दि. 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. अपात्र शिधापत्रिका शोध मोहीममध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने विहित केलेल्या निकषांच्या माध्यमातून खालील शासन निर्णयात देण्यात आल्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
फॉर्म PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा.